breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
#CoronaVirus: राज्यात आणखी एका काँग्रेसच्या आमदाराला कोरोनाची लागण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/ruturaj-patil-759.jpg)
कोल्हापूर: राज्यात कोरोनाच्या संकटाचा धोका दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. अशात अद्यापही रुग्णसंख्येवर नियंत्रण आणणं शक्य झालेलं नाही. त्यात राज्यातील अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त वारंवार समोर येत आहे. आताही आणखी एका काँग्रेस आमदाराला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर येत आहे.
कोल्हापूर इथले काँग्रेस आमदार रूतुराज पाटील यांचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे. कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह येताच त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर इथेच उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं असल्याचं सांगण्यात येत आहे. तर पाटील यांच्या संपर्कात आलेल्यांनी खबरदारी घ्यावी, लक्षणं असल्यास तात्काळ टेस्ट करून घ्यावी असं आवाहन आमदार रूतुराज पाटील यांनी केलेलं आहे.