breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

#CoronaVirus: नवी मुंबईत एकही व्हेंटिलेटर नाही, दोन श्वासांमधील अंतर संपल्यावर प्रयत्न करुन काहीच अर्थ नाही: गणेश नाईक

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या आणि शासकीय रुग्णालयांमध्ये सध्या एकही व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीये. त्यामुळे कोरोना रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत, असा आरोप भाजप आमदार गणेश नाईक यांनी केलेला आहे. “दोन श्वासांमधील अंतर संपल्यानंतर कितीही प्रयत्न केले तरी ते व्यर्थ आहेत. त्यामुळे व्हेटिंलेटर खरेदी करा”, असं आवाहन गणेश नाईक यांनी महापालिकेला केलं आहे.

आमदार गणेश नाईक यांनी आज नवनियुक्त मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी नवी मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा आणि इतर वैद्यकीय समस्यांबाबत चर्चा केली आहे. या बैठकीनंतर गणेश नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन नवी मुंबईत एकही व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचा दावा केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button