breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
#CoronaVirus: कोरोनामुळे जग मंदीच्या फेऱ्यात…
करोनामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असून जगाने आर्थिक मंदीच्या अवस्थेत प्रवेश केला आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टॅलिना जॉर्जिव्हा यांनी म्हटले आहे. आताची परिस्थिती निराशाजनक असली तरी २०२१ मध्ये जगाची आर्थिक स्थिती पुन्हा आशादायी स्थितीकडे वाटचाल करील असा दिलासाही त्यांनी दिला.
नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक असलेल्या जॉर्जिव्हा यांनी सांगितले की, आम्ही २०२० व २०२१ या दोन्ही वर्षांच्या संभाव्य आर्थिक स्थितीचा आढावा घेतला असून सध्या तरी जगाने २००८-०९ मधील मंदीपेक्षा जास्त गंभीर मंदीच्या अवस्थेत प्रवेश केला आहे, पण २०२१ मध्ये परिस्थिती सुधारेल असा आमचा अंदाज आहे.