breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

आपल्याच मर्जीतले-ताटाखालचे अधिकारी, काळ्या यादीतील कंपन्यांना कंत्राट; पडळकरांचे ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

मुंबई |

प्रशासनात आपल्याच मर्जीतले-ताटाखालचे अधिकारी बसवायचे आणि त्यांच्या मार्फत काळ्या यादीत असलेल्या कंपन्यांना आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षेचं कंत्राटं द्यायचं, जेणेकरुन पदभरतीमध्ये वसुलीचा घोडेबाजार चालवण्याची आघाडी सरकारची परंपरा राखता आली पाहिजे असा आरोप भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. “आरोग्यमंत्र्यांचे हे कारनामे आरोग्य विभागाच्या पदभरती घोटाळ्यामुळे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहेत.

हे सरकार आता अधिकृतरित्या वसुली सरकार म्हणून मान्यताप्राप्त झालेलं आहे,” अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. “होतकरू विद्यार्थ्यांचा, उमेदवारांचा गळा आवळणाऱ्या घोटाळ्याचे धागे-दोरे थेट मंत्रालयापर्यंत पोहचलेले आहेत. आणि या पेपरफुटीच्या लिंक आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यापर्यंत पोहचल्या आहेत. म्हणजे या सगळ्या घोटाळेबाजीला राज्य सरकारचंच अभय होतं का?,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“आरोग्यमंत्र्यांचा व घोटाळेबाजाचा संबंध नेमका काय आहे? हे जनतेला कळालं पाहिजे. हे प्रकरण म्हणजे सगळी यंत्रणाच पोखरलेली आहे. या गंभीर घोटाळ्याची आरोग्यमंत्र्यांसहीत न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे . राज्य सरकारने जर याबाबत टाळाटाळ केली तर आम्हीच हा घोटाळा सीबीआयकडे घेऊन जाऊ,” असा इशारा पडळकरांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button