संसदेच्या सुरक्षेवरून लोकसभेत आणि राज्यसभेत गोंधळ, विरोधी पक्षातील ३१ खासदार निलंबित
![Confusion in Lok Sabha and Rajya Sabha or Parliament security, 31 opposition MPs suspended](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Lok-Sabha-780x470.jpg)
नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून आजही विरोधी पक्षाने लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळ घातला. त्यानंतर विरोधी पक्षांच्या ३१ खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. लोकसभा अध्यक्षांनी ही सर्वात मोठा कारवाई आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी निलंबित केलेल्या खासदारांमध्ये अधीर रंजन चौधरी, टीआर बालू, दयानिधी मारन यांचा समावेश आहे.
संसदेत झालेल्या या गोंधळानंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी विरोधी पक्षांच्या ३१ खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला. संसदेच्या कामकाजात अडथळे आणल्याप्रकरणी अध्यक्षांनी गोंधळ घालणाऱ्या ३१ खासदारांना निलंबित केलं. त्यानंतर संसदेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.
A few more MPs suspended from Lok Sabha, including Leader of Congress in Lok Sabha Adhir Ranjan Chowdhury. A total of 31 Lok Sabha MPs suspended today.
— ANI (@ANI) December 18, 2023
हेही वाचा – ‘गिरीश महाजनांचे सलीम कुत्तासोबत संबंध’; एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप
निलंबित केलेल्या खासदारांची नावे
अधीर रंजन चौधरी, के.जय.कुमार, अपूर्व पोद्दार, प्रसून बॅनर्जी, मोहम्मद वसीर, जी.सेल्वम, सी.एन.अन्नादुराई, डॉ.टी.सुमाथी, के.नवस्कानी, के.वीरस्वामी, एन.के.प्रेमचंद्रन, सौगता रॉय, शताब्दी रॉय, असित कुमार मल, कौशलेंद्र कुमार, अँटोनी अँटोनी, एस.एस.पलानामनिकम, अब्दुल खालिद, तिरुवरुस्कर, विजय बसंत, प्रतिमा मंडल, काकोली घोष, के.मुरलीधरन, सुनील कुमार मंडल, एस.राम लिंगम, के.सुरेश, अमर सिंह, राजमोहन उन्नीथन, गौरव गोगोई आणि टी.आर.बालू.
या आधी १३ खासदारांचं निलंबन
याआधीही लोकसभेतील १३ खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. त्यात काँग्रेसचे टीएन प्रतापन, हिबी इडन, जोतिमणी, रम्या हरिदास, डीन कुरियाकोसे, व्हीके श्रीकंदन, बेनी बेहानन, मोहम्मद जावेद आणि मनीकोम टागोर यांचा समावेश आहे. द्रमुकच्या कनिमोळी, सीपीआय(एम)चे एस वेक्शन आणि सीपीआयचे के. हे सुब्बारायन आहे. तर टीएमसी सदस्य डेरेक ओब्रायन यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे.