breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारण

परळीतल्या बोगस मतदानाच्या क्लिप व्हायरल; रोहित पवारांचे गंभीर आरोप

मुंबई : बीड लोकसभा मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान पार पडले. मात्र परळी तालुक्यासह केज, धारुर तालुक्यांमध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप केला जात आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शनिवारपासून या विषयावर आवाज उठवला आहे. रोहित पवारांनी सातत्याने ट्वीट करुन याबाबत व्हिडीओ शेअर केले आहेत.

भाजपकडून बीड लोकसभा मतदारसंघात विशेषतः परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान, मतदान केंद्रे ताब्यात घेणे असे गैरप्रकार करण्यात आले. सत्ताधाऱ्यांची ही दडपशाही रोखण्याची हिम्मत बबनभाऊ गित्तेंसारख्या अनेक सामाजिक कार्यकत्यांनी दाखवली.

निवडणूक आयोग या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करणार आहे की फक्त विरोधकांवर आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यातच धन्यता मानणार आहे? असो पण एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणाला आदर्श घालून देणाऱ्या बीड जिल्ह्यात दडपशाहीचे हे प्रकार सत्ताधाऱ्यांना शोभत नाहीत.

हेही वाचा – शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मान्सून अंदमानमध्ये दाखल

बीड जिल्ह्यात विशेषता परळी भागात मतदान कक्षातून मतदारांना बाहेर काढून आपल्याला हवे तसे मतदान भाजपने गुंडांकडून करून घेतल्याची माहिती समोर येत आहे.म्हणजेच पवित्र देवस्थान असलेल्या परळीत आता यापुढे लोकशाही नव्हे तर गुंडाराज चालणार का? हे असेच सुरू राहिले तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश व्हायला वेळ लागणार नाही.निवडणूक आयोग या गुंडगिरीला चाप लावणार आहे की केवळ बघ्याची भूमिका घेणार आहे? निवडणूक आयोगाने उत्तर द्यावे.

परळीतल्या इंजेगाव येथील व्हिडीओ पवारांनी शेअर केला. ते म्हणतात, बूथ ताब्यात घेऊन मतदान मारण्याचा हा नवा परळी पॅटर्न महाराष्ट्राला शोभत नाही. पंकजाताई तुम्ही कदाचित यामध्ये सहभागी नसालही, पण तुमचे बंधुराज कुठल्या पातळीला जाऊ शकतात हे कदाचित तुम्हालाही माहित नसेल.महाराष्ट्रासारख्या राज्यात असे प्रकार घडवून आणण्याची हिम्मत येतेच कुठून? असे प्रकार करण्याची गरज पडतेच का? सत्तेतून ही हिम्मत येत असेल तर मग ही लोकशाहीसाठी निश्चितच धोक्याची घंटा आहे. निवडणूक आयोगाने स्थानिक मंत्री महोदयासह स्थानिक प्रशासनाची चौकशी करावी ही विनंती. निवडणूक आयोग किती दिवस बघ्याची भूमिका घेतं, हे बघुया!

बीड लोकसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी मागच्या आठवड्यात या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यांनी पत्रात म्हटलं की, परळी मतदार संघातील इंजेगांव, सारडगांव, धर्मापुरी, डिग्रस, नाथ्रा, कीडगांव साबळा, जिरेवाडी, बालेवाडी व कन्हेरवाडी या गावातील मतदान केंद्रावर व मतदान केंद्र क्रमांक १८८, १८९, १३२ व १६१ आणि केज तालुक्यातील देवगाव, लाडेवडगाव, माजलगांवमधील गोविंदवाडी व धारुर मधिल सोनिमोहा, पिंपरवडा, मंदवाडी व चाडगांव आष्टीमधील वाली आणि पाटोदा मधील वाघीरा हे सर्व मतदान केंद्र ताब्यात घेवून बोगस मतदान केलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button