Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडे ‘आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक सहाय्यता संस्थे’च्या अध्यक्षपदाची सूत्रे…

मुंबई : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार 2026 या वर्षासाठी आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक सहाय्यता संस्था अर्थात इंटरनॅशनल इन्स्टिटयूट फॉर डेमोक्रॅसी अँड इलेक्ट्रोल आसिस्टस (आयडीईए) या आंतर-सरकारी संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारणार आहेत. 3 डिसेंबर 2025 रोजी स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे होणाऱ्या सदस्य देशांच्या परिषदेत ते औपचारिकरीत्या अध्यक्षपद स्वीकारतील. आगामी वर्षभर ते या संस्थेच्या सर्व महत्त्वाच्या परिषदांचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.

1995 मध्ये स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय आयडीईए ही संस्था जगभरातील लोकशाही प्रक्रियेचे बळकटीकरण करण्यासाठी कार्यरत आहे. सध्या 35 देशांचे या संस्थेचे सदस्यत्व असून अमेरिका आणि जपान हे निरीक्षक देश आहेत. समावेशक, लवचिक आणि जबाबदार लोकशाही व्यवस्थांचा प्रसार हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे.

अध्यक्षपद मिळणे हा भारताच्या निवडणूक आयोगाच्या जागतिक प्रतिष्ठेचा मोठा सन्मान मानला जात आहे. जगातील सर्वात विश्वसनीय आणि अभिनव निवडणूक व्यवस्थापन संस्थांपैकी एक म्हणून भारताच्या निवडणूक आयोगाची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख आहे. भारत हा आयडीईए चा स्थापक सदस्य असून विविध लोकशाही उपक्रमांमध्ये त्याचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे.

हेही वाचा –  विद्यार्थ्यांना मिळाला प्रभावी ‘करिअर मंत्र’

अध्यक्ष म्हणून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा जगातील सर्वात मोठ्या निवडणुकांचे आयोजन करण्यातील भारताचा अनुभव हा संस्थेच्या जागतिक कार्ययोजनेत वापरण्याचा मानस आहे. निवडणूक व्यवस्थापन संस्था यांच्यात ज्ञान-विनिमय, व्यावसायिक नेटवर्किंग आणि पुराव्यावर आधारित जागतिक निवडणूक सुधारणा यांना या सहकार्यातून गती मिळणार आहे.

जवळपास एक अब्ज मतदार असलेल्या भारताची पारदर्शक आणि सुबद्ध निवडणूक प्रक्रिया ही जगासाठी आदर्श मानली जाते. आगामी वर्षभर भारत आपल्या उत्तम पद्धती आणि अनुभव आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून देणार आहे.

भारतीय निवडणूक आयोगाच्या प्रशिक्षण संस्था (इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमॉक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट (आयआयडीईएम) ) आणि आयडीईए यांच्यात संयुक्त कार्यक्रम, कार्यशाळा आणि संशोधन उपक्रम राबविण्यात येणार आहेत. दिशाभूल करणारी माहिती, निवडणूक हिंसाचार आणि मतदारांचा विश्वास कमी होणे, या जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ही भागीदारी अधिक प्रभावी ठरणार आहे.

स्थापनेपासून आयआयडीईएम ने भारतासह जगभरातील निवडणूक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. संस्थेने आतापर्यंत 28 देशांबरोबर सामंजस्य करार केले असून 142 देशांतील 3169 निवडणूक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली इसीआय आणि (आयडीईए) एकत्रितपणे भारताच्या तांत्रिक व प्रशासकीय नवकल्पना आणि सर्वोत्तम पद्धतींचे जागतिक स्तरावर दस्तऐवजीकरण व प्रसार करण्याचे काम पुढे नेणार आहेत, असे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धापत्रकाद्वारे कळविले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button