.. तर धनंजय मुंडेंचा राजीनामा कशाला? छगन भुजबळांचं वक्तव्य

Chhagan Bhujbal | मला मंत्री व्हायचं आहे म्हणून कुणाचातरी राजीनामा घ्यावा हे माझ्या मनातही नाही. धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जातो आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे की पूर्ण चौकशी झाली की आका, काका सगळ्यांवर कारवाई करु. त्याआधीच धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागितला जातो आहे? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे.
छगन भुजबळ म्हणाले, की जोपर्यंत नक्की होत नाही, ठोस पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची घाई का? त्यांनी राजीनामा का द्यावा आणि कुणी मागावा? साप साप म्हणून भुई थोपटणं योग्य नाही. कारण नसताना, काहीही सिद्ध झालेलं नसताना राजीनामा घेणं मी तेलगी प्रकरणात सोसलं आहे असं छगन भुजबळ म्हणाले. राजकारणामध्ये अशा गोष्टी होत असतात. मला वाटतं की कुणावरही अन्याय होता कामा नये.
हेही वाचा – HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, ८ महिन्याच्या बाळाला लागण
संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रूरपणे झाली आहे. सुरेश धस यांनी या हत्येचं क्रौर्य सांगितलं. ते ऐकतानाही अंगावर काटा आला, या प्रकरणात जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत वाईट पद्धतीने झाला. आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, पण कायदा सांगतो त्याप्रमाणे जो निरपराध अपराध्याला शिक्षा होता कामा नये. मी कुणाची बाजू घेतो आहे असं नाही, जे दोषी आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असं छगन भुजबळ म्हणाले.
माणिकराव कोकाटे यांना सांगायचं आहे छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संस्थापक आहे शरद पवारांसह असलेला. निशाणी घड्याळ, नाव कसं असलं पाहिजे? कोकाटे हे उपरे आहेत. पाच वर्षांपूर्वी त्यांनी माणसं पाठवली त्यांना यायचं आहे म्हणून, शरद पवारांना सांगून मी त्यांना पक्षात घेतलं. कोकाटे काल आले आहेत मला बोलण्याचा त्यांना काय अधिकार? असाही प्रश्न छगन भुजबळ यांनी विचारला आहे.




