ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रमुंबईराजकारण

ओबीसी आरक्षणासाठी कुणाच्याही पाया पडायला तयार – छगन भुजबळ

मुंबई: राजकारण आपल्या स्थानी, मात्र ओबीसी आरक्षणाबाबत सर्वांनी एकत्र या. ओबीसी आरक्षणासंदर्भात तोडगा निघणं महत्वाचं आहे. त्यासाठी सामुहिक नेतृत्व करु, असं आवाहनही भुजबळ यांनी सर्व विरोधकांना केलंय. येत्या 2 ते 3 दिवसांत इम्पेरिकल डाटासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचंही यावेळी भुजबळांनी सांगितलं. त्याचबरोबर बारामती नेहमीच तुमच्याबरोबर राहिली आहे. बारामतीनेच आरक्षण दिलंय. व्ही. पी. सिंग यांनी मंडल आयोग लागू केल्यावर महाराष्ट्राने पहिल्यांदा तो स्वीकारला. प्रत्येक वेळी बारामती बारामती करु नका, बरोबर असताना वितुष्ठ वाढवायचं नाही, असा इशाराही भुजबळ यांनी दिलाय.

 

ओबीसी आरक्षणासाठी कुणाच्याही पाया पडायला तयार असल्याचं अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय. ओबीसी आरक्षण टिकलं पाहिजे. शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचंही भुजबळ म्हणाले. ओबीसी आरक्षणप्रश्नी पूर्ण सहकार्य करायला तयार आहे. रॅन्डम सॅम्पलिंग संदर्भात मतभेदांवर चर्चा व्हावी. एकत्रितपणे बसून चर्चा करणं गरजेचं असल्याचंही भुजबळ म्हणाले. दरम्यान, भुजबळ यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button