breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

काँग्रेसची अवस्था रंगमंचावरील ‘नाच्या’सारखी; भाजप नेत्याची खोचक टीका

मुंबई | काँग्रेससारखा नाटक (नौटंकी) करणारा पक्ष आजपर्यत बघितला नाही. जसा रंगमंचावर नाच्या असतो तशी काँग्रेस पक्षाची अवस्था झाली आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. तसेच, केंद्र व राज्य सरकारच्या योजनेमुळे सध्या महाविकास आघाडी रडकुंडीला आली आहे. त्यामुळे चांगल्या काही योजना आणल्या तर त्याला विरोध करणे हे विरोधी पक्षाचे काम झाले असल्याचंही ते म्हणाले. गंगाधराव फडणवीस मेमोरियल डायग्नोसीस फिरता दवाखानाचे लोकार्पण बावनकुळे यांच्या करण्यात करण्यात आले, या लोकार्पण कार्यक्रमानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, काँग्रेसच्या काळात जी कामे झाली नाही ती सर्व कामे केंद्र व राज्य सरकार आता पूर्ण करत आहे. काँग्रेसचे अर्थसंकल्पाविरोधातील आंदोलन म्हणजे एक प्रकारे नाटकच आहे. लोकसभा निवडणुकीत खटाखटा पैसे देऊ म्हणून काँग्रेसने महिलांची फसवणूक केली आहे. उद्धव ठाकरे यांना अर्थसंकल्प समजत नाही हे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे त्यामुळे अर्थसंकल्पावर सामनातून केलेल्या टीकेला काहीच अर्थ नाही.

हेही वाचा     –      १०० कोटींची वसूली ते ठाकरेंना अडकवण्याचा प्लॅन; श्याम मानव यांचा मोठा दावा 

शिवाय राष्ट्रवादी कांग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना मोदीवर टीका केल्याशिवाय झोप येत नाही. त्यामुळे आपण काही करायचे नाही आणि दुसऱ्यांनी काही चांगले केले तर त्याला विरोध आणि टीका करायची हा विरोधी पक्षाची सवय झाली नाही. लोकसभा निवडणुकीत खोटे बोलून जनतेची मते घेतली आणि हा खोटारडेपणा जनतेसमोर आला आहे. मात्र आता विधानसभा निवडणुकीत केंद्र व राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचवून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

महाराष्ट्रासाठी अनेक योजना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे राज्याला काही मिळाले नाही या विरोधकांच्या टीकेला काही अर्थ नाही. त्यांनी केंद्राचा अर्थसंकल्प समजून घेतला नाही. काँग्रेसने खोटारेडपणा करुन मते मिळवली असली तरी आम्ही मात्र लाडली बहीण योजना जाहीर करुन त्या माध्यमातून आता महिलांच्या खात्यात वर्षाला अठरा हजार रुपये जमा होणार आहे. आम्ही पाच वर्षेचे नियोजन केले आहे त्यामुळे प्रत्येक विभागाला निधी मिळणार असून तो कुठेही कमी करण्यात आला नाही. प्रत्येक विभागाचा पैसा हा द्यावा लागतो. काँग्रेस पक्ष आता रडकुंडीला आला आहे. त्यांना विधानसभा निवडणुकीत आपले कसे होईल याची भिती वाटायला लागली आहे त्यामुळे आंदोलन केली जात असल्याचे बावनकुळे म्हणाले.

काँग्रेसने ५५ वर्षात काही केले नाही तर जनतेला कन्फ्युज करत मत घेतली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी विकसित भारतासाठी काम करत आहे. महाविकास आघाडीचे सरकार आले तर हे केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजना बंद करतील. त्यामुळे शेतकरी, महिला व युवकांवर अन्याय होील. उद्धव ठाकरे यांचे अडीच वर्ष सरकार असताना त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना बंद केल्या होत्या. त्यामुळे आगामी महाविकास आघाडीला विधानसभेत खोटे बोलून मत घेता येमार नाही असेही बावनकुळे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button