breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

‘पिंपरी विधानसभा RPI ला दिली पाहिजे अन्यथा..’; RPI चा महायुतीला इशारा

पिंपरी | लोकसभेप्रमाणेच राज्यातील यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. अशातच महायुतीतच विधानसभेसाठी चढाओढ रंगल्याचं पाहायला मिळत आहे. पिंपरीच्या जागेवरून महायुतीत तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. लोकसभेची पुनरावृत्ती करायची नसेल, तर महायुतीनं पिंपरी विधानसभा आम्हाला सोडावी सोडावी, असा इशारा देत आरपीआय नेत्या चंद्रकांता सोनकांबळे यांनी पिंपरीवर दावा ठोकला आहे.

आरपीआय नेत्या चंद्रकांता सोनकांबळे म्हणाल्या, आम्ही भाजप आणि शिवसेना सोबतचे पहिले घटक पक्ष आहोत. त्यानंतर अदित दादा आले. २०१४ मध्ये ही जागा आरपीआयला सोडली होती. त्यावेळी ४० हजार मतं घेतली होती. फक्त २२०० मतांनी या ठिकाणी पराभव झाला होता. त्यानंतर २०१९ मध्ये ही जागा मिळाली नाही. मात्र आत्ता ही जागा आरपीआय गटाला दिलीच पाहिजे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आरपीआयला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे जनतेमध्ये आणि आंबेडकर चळवणीमध्ये एक प्रकारचा रोष आहे. त्यामुळे आता ही जागा आरपीआय गटाला मिळावी. तरच घटक पक्षाला न्याय मिळेल.

हेही वाचा    –      देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी कायम राहणार!

पिंपरीच्या जागेवर आम्ही ठाम आहोत. ही जागा आम्हाला मिळणं गरजेचं आहे. अन्याथा या जागेची किंमत सर्वांना मोजावी लागेल, असा इशारा चंद्रकांता सोनकांबळे यांनी महायुतीला दिला आहे. आरपीआयला अद्याप कोणतंही चिन्ह नाही. चिन्ह मिळवण्यासाठीच आम्ही ही निवडणूक लढवत आहोत, असंही चंद्रकांता सोनकांबळे म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button