breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘रोहित पवारांचा संजय राऊत झालाय’; चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार हेदेखील आता रोजच माध्यमांना प्रतिक्रिया देताना सत्ताधाऱ्यांवर तुटून पडत असतात. राज्याच्या सर्वच विषयांवर ते आपले मत व्यक्त करताना सरकारला धारेवर धरतात. रोहित पवारांच्या या भूमिकेवर भाजपाचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खोचक टोला लगावला आहे.

विधानभवनात आज रोहित पवार यांनी राज्याच्या विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला. यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील बोलायला आले. यावेळी चंद्रकांत पाटलांनी रोहित पवारांकडे पाहून, रोहित पवारांचा आता संजय राऊत झालेला आहे. रोज सकाळी त्यांनी बोललंच पाहिजे, असं म्हटलं. यावर रोहित पवारांनी हसत हसत आपला संजय राऊत झालेला नाही, असं सांगितलं.

हेही वाचा     –      मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये १०० टक्के सवलत

रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

रोहित पवार यांनी राज्य सरकारने मुलींचे व्यावसायिक शिक्षण मोफत करण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ही योजना आणत असताना आणखी अभ्यास करण्याची गरज होती. वाणिज्य आणि कला शाखेच्या विद्यार्थीनींना यातून वगळण्यात आले आहे. या कोर्सेसचे शैक्षणिक शुल्क अधिक नसते मात्र ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांना तेवढंही शुल्क भरणं अशक्य होतं. त्यामुळे या योजनेत वाणिज्य, कला शाखेत शिक्षण घेणाऱ्या मुलींनाही सामावून घ्यावे. मुलींसाठी सरकार योजना आखत आहेच, त्याशिवाय मुलांसाठीही योजना आणण्याची गरज आहे. पाच हजार कोटी या योजनेसाठी सरकारला लागणार आहेत. त्यामुळे मुलांसाठीही योजना आणावी, असं रोहित पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button