TOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय
चंद्रकांत पाटलांना शाईफेकीची पुन्हा धमकी, घरूनच केलं भिमा कोरेगाव विजयस्तंभाला अभिवादन
![Chandrakant Patal again threatened to throw ink, saluted Bhima Koregaon Vijaystambha from home](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/Chandrakant-Patil.jpg)
पुणे : महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे भाजपचे नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शाईफेकीची घटना घडली होती. आज पुन्हा एकदा भिमा कोरेगाव विजयस्तंभाला अभिवादन करण्यास आल्यास शाई फेकू अशी धमकी दिली असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. त्यामुळे पाटील यांनी घरून विजयस्तंभाला अभिवादन केलं.
भिमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो आंबेडकर अनुयायी पोहोचले आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सुद्धा भिमा कोरेगावला जाणार होते. मात्र, पाटील यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून आपल्यावर शाईफेक केली जाणार असल्याचा इशारा दिला आहे, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.