breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

मंत्रिमंडळ विस्तारात पुणे-पिंपरीला मंत्रिपदाची शक्यता

पुणे : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहराला या विस्तारात मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील हे मंत्री आहेत. पण शहरातील ताकद वाढवण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी शहरातील आमदारांना ताकद देण्याची चर्चा आहे.

भाजपमधून पुण्यातील पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ तर पिंपरी-चिंचवडमधील पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांना मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे. भाजप अन् राष्ट्रवादीमधून हे दोघे प्रबळ दावेदार असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातून भाजपचे दौंडचे आमदार राहुल कुल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे चाकण-खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नावाचीदेखील जोरदार चर्चा आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही शहरातील ताकद वाढवण्यासाठी आमदार मिसाळ आणि आमदार बनसोडे यांना मंत्रिपद देऊ शकतात.

हेही वाचा    –     आनंदाची बातमी! शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज २००० रुपये जमा होणार! 

मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्यानंतर आमदार बनसोडे हे मुंबईला रवाना झाले आहेत. त्यावर ते म्हणाले, मुंबईला येण्याबाबत मला सध्या तरी निरोप आलेला नाही. मी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांना भेटण्यासाठी मुंबईला निघालो आहे. विस्ताराबाबत माझी त्यांच्याशी चर्चा झाली नाही. पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांकडे मतदारसंघातील काम घेऊन जात असतो. मंत्रिमंडळाचा विस्तार पाठीमागेच व्हायला हवा होता. परंतु, लोकसभेचा निकाल पाहिला त्या दृष्टीने मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला पाहिजे जेणेकरून मंत्र्यांच्या त्या-त्या मतदारसंघात प्रभाव पडेल. मंत्रिपदासाठी मी नेहमीच आशावादी आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुका आणि येऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत सत्ता काबीज करण्यासाठी अजित पवारांचे कट्टर समर्थक अण्णा बनसोडे यांना मंत्रिपद मिळावे यासाठी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button