breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

ब्रिटन योगिनी देवीची प्राचीन मूर्ती भारताला परत करणार; ४० वर्षापूर्वी गेली होती चोरीला

नवी दिल्ली |

४० वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील मंदिरातून चोरीला गेलेली योगिनी देवीची प्राचीन मूर्ती ब्रिटनमधून भारतात परत पाठवली जाणार आहे. ही मूर्ती आठव्या शतकातील असल्याचं म्हटलं जातं. ही मूर्ती १९७० च्या उत्तरार्धात किंवा १९८० च्या सुरुवातीला उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील लोकारी गावातील एका मंदिरातून चोरीला गेली होती. ही प्राचीन मूर्ती भारतात परत पाठवण्यासाठी औपचारिकता पूर्ण केली जात आहे, अशी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांनी पुष्टी केली आहे.

ट्रेड आणि इकॉनॉमिक अफेअर्सचे फर्स्ट सेक्रेटरी जसप्रीत सिंग सुखीजा म्हणाले, की “लंडनमधील भारतीय उच्चायुक्त योगिनी देवीची मूर्ती परत घेण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. बहुतेक औपचारिकता पूर्ण झाल्या आहेत आणि आम्ही मूर्ती परत घेण्याच्या अंतिम टप्प्यात आहोत. ख्रिस मारिनेलो आणि विजय कुमार यांनी काही महिन्यांपूर्वी ही मूर्ती ओळखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. योगिनी देवीची मूर्ती लवकरच उच्चायुक्तांकडे सुपूर्द केली जाईल,” असं त्यांनी सांगितलं.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, ‘आर्ट रिकव्हरी इंटरनॅशनल’ या संस्थेचे संस्थापक मारिनेलो यांना ब्रिटनमधील एक महिला तिच्या पतीच्या मृत्यूनंतर घरातून वस्तू विकत असताना ही मूर्ती सापडली होती. त्यानंतर मारिनेलो यांनी भारतातून चोरलेल्या सांस्कृतिक वस्तूंच्या पुनर्प्राप्तीसाठी समर्पित इंडिया प्राइड प्रोजेक्टचे सह-संस्थापक विजय कुमार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी ही मूर्ती ओळखल्यानंतर ही मूर्ती परत घेण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button