Breaking News: ….अरे ये अबू आझमी छत्रपतींना मानतो, मग ‘औरंग्या’चा लळा का लावतो? (व्हीडिओ)
विधानसभा सभागृहात आमदार महेश लांडगेंचा ‘रुद्रावतार’: समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना तुफान झापले
![Breaking News: ....Hey, Abu Azmi likes Chhatrapati, why does he fight against 'Aurangya'?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/mahesh-Landge-780x470.jpg)
मुंबई । प्रतिनिधी
‘‘… अरे ये अबु आझमी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानतो, मग औरंगजेबाचे उदात्तीकरण कशासाठी करतो…’’ अशा शब्दांत भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी भर सभागृहात समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांना झापले. लांडगे यांचा रुद्रावतार पाहून सभागृहात शांतता पसरली होती.
शिवप्रतिष्ठा हिंदूस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन कारवाई बाबत सभागृहात चर्चा सुरू होती. त्यावेळी शाब्दिक खडाजंगी झाली. आमदार लांडगे प्रश्न उपस्थित करीत असताना अबू आझमी यांनी मध्येच ‘‘शिवाजी महाराज की जय’’ अशी घोषणा दिली. यावर संतापलेल्या लांडगे यांनी ‘‘शिवाजी महाराजांना मानतो मग औरंग्याला लळा का लावतो? ’’ असा प्रश्न केला. अरे ये… अबू आझमी… असा उल्लेख केला. लांडगे यांचा रुद्रावतार पाहूण सभागृहात शांतता पसरली. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत परिस्थिती निवळवण्याचा प्रयत्न केला.
पहा व्हीडिओ…