लोकसभेच्या निकालानंतर महायुतीत बिघाडी? जाणून घ्या नेमके प्रकरण काय?
![Breakdown in grand alliance after Lok Sabha result](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Eknath-Shinde-Devendra-Fadnavis-and-Ajit-Pawar-780x470.jpg)
मुंबई | देशभरातील काल लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. २०१४ नंतर पहिल्यांदाच भाजप २७२ च्या आकड्यापासून दूर राहिली आहे. महाराष्ट्राबाबत बोलायचे झाले तरी राज्यात यंदा मोदी फॅक्टर काहीसा कमी झाला असल्याचे कालचे लोकसभा आकडे दर्शवत आहेत. एवढेच नव्हे तर यावरून आता महायुतीमध्ये देखील मोठी बिघाडी होण्याची शक्यता आहे.
सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार, विधान परिषद निवडणुकीसाठी ३ जागांवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आज अर्ज भरणार आहेत. मुंबई पदवीधर मतदारसंघातून दीपक सावंत उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मात्र या मतदारसंघातून भाजपाने किरण शेलार यांना उमेदवारी जाहीर केलीये.
हेही वाचा – ‘तुझी बहीण असल्याचा अभिमान वाटतो’; प्रियंका गांधींची राहुल गांधींसाठी भावूक पोस्ट
तर सध्या भाजपकडे असलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघातही शिंदे गटाचे सचिव संजय मोरे तसंच मुंबई शिक्षक मतदार संघासाठी शिवाजीराव शेंडगे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे या तिनही जागांवरुन महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, याबाबत आता महायुतीचे वरिष्ठ शिष्टमंडळ काय निर्णय घेते हे पाहावे लागणार आहे हे नक्की.