breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

सीमावाद ः बोम्मईंच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे हा वाद वाढला : अजित पवार

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी ।

बोम्मईंनी वादग्रस्त वक्तव्य केले नसते, तर हा वाद वाढला नसता. बोम्मईच्या वक्तव्यामुळे राज्याच्या अस्मितेला धक्का लागला. त्यामुळे हे सगळं प्रकरण घडलं, असे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद गेल्या काही दिवसांपासून अधिकच चिघळत चालला आहे. बोम्मईंनी वादग्रस्त वक्तव्य केले नसते, तर हा वाद वाढला नसता. बोम्मईच्या वक्तव्यामुळे राज्याच्या अस्मितेला धक्का लागला. त्यामुळे हे सगळं प्रकरण घडलं, असे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद गेल्या काही दिवसांपासून अधिकच चिघळत चालला आहे. या सीमावादाच्या मुद्द्यावर बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक महत्वपूर्ण बैठक बोलावली होती. या बैठकीला महाराष्ट्र आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री उपस्थित होते. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आज अजित पवार यांनी भाष्य केले.

17 डिसेंबरच्या महाविकास आघाडीच्या महामोर्चासंदर्भात आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “बोम्मई यांनी दिल्लीतील बैठकीत सामंजस्याची भूमिका घेतल्याचं दिसतंय. बैठकीत ठरल्याप्रमाणे कृती व्हायला हवी. जे ठरलंय त्याप्रमाणे बोम्मईंनी वागलं पाहिजे. राज्याच्या एकात्मतेला धक्का लागेल, असं आम्ही कधीच वागलो नाही. बोम्मईंनी वादग्रस्त वक्तव्य केलं नसतं, तर हा वाद वाढला नसता. बोम्मईच्या वक्तव्यामुळे राज्याच्या अस्मितेला धक्का लागला. त्यामुळे हे सगळं प्रकरण घडलं. खरंच कुणी यामागचा मास्टरमाइंड असेल, तर तो समोर यायला हवा”, असे अजित पवार यांनी सांगितले.

“बुधवारी गृहमंत्र्यांनी बैठक बोलवली होती. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. बोम्मई यांनी महाराष्ट्राबाबत वादग्रस्त वक्तव्य केले नसते तर असे झाले नसतं. कारण नसताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी वाद निर्माण केला. यामुळे महाराष्ट्र सीमेवरील गावकऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला. सीमेवरील गावकऱ्यांनी कर्नाटकमध्ये जाण्याचं मत व्यक्त केलं. ही भावना पण राज्याच्या दृष्टीने अडचण निर्माण करणारी आहे. कर्नाटकने समंजस भूमिका घेतली पाहिजे. दोन्ही बाजूंनी समजून घेणं गरजेचं आहे”, असेही अजित पवार यांनी म्हटले.

“काल चर्चा झाली की यामागचा सूत्रधार कोण आहे? हे का घडलं? यात जाणीवपूर्वक कुणी बातम्या सोडल्या? त्यातून लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. लोकांच्या भावनांचा उद्रेक होऊन या सगळ्या गोष्टी घडल्या. काहींना वाटतंय की हे विरोधकांनी केलं. आमचं स्पष्ट म्हणणं आहे की आम्ही नेहमीच राज्याच्या एकसंधतेला धक्का लागणार नाही हाच दृष्टीकोन ठेवत असतो. तरीही जर कुठली शंका केंद्राला वाटत असेल, दोन राज्यांतल्या प्रमुखांना शंका वाटत असेल तर त्यातलं दूध का दूध, पानी का पानी समोर आलं पाहिजे”, असेही अजित पवार यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button