breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारण

ब्लू प्रिंट, विधानसभा ते सरकारच्या योजनांपर्यंत…; चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली कोअर कमिटीच्या बैठकीतील माहिती

Bawankule on Core Committee Meeting लोकसभा निवडणुकीनंतर सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहताना दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटात आगामी विधानसभाची रणनीती आखण्याची तयारी सुरु झालीय. त्यासाठी  भाजपच्या कोअर कमिटीची बैठक काल मुंबईत झाली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून प्राथमिक ब्लू प्रिंट तयार केली जाणार आहे. तसेच पुन्हा एक कोअर कमिटीची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी बोलताना,”लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही एक विश्लेषणात्मक बैठक होती. ज्या ठिकाणी आम्ही कमी आहोत, त्या ठिकाणी पुन्हा एकदा संघटना वाढवणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

तसेच केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना या समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता काय केले पाहिजे, यावर चर्चा केली. त्याचबरोबर विधान परिषदेच्या निवडणुकांवरही चर्चा झाली. सामाजिक भौगोलिक परिस्थितीच्या आधारावर आणि आणखी काही निकष लावून चर्चा केली. आम्ही यादी केंद्राकडे पाठवू आणि केंद्र त्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बावनकुळे यांनी,”केंद्रातील बैठकी महत्त्वाची होती. त्यावरही विचार मंथन केलं. ज्या ठिकाणी कमी आहोत त्या ठिकाणी पुन्हा काम करणार अजून चांगलं काम करणार आणि जनतेचा विश्वास पुन्हा जिंकणार, अअसा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. तसेच मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण या विषयावर चर्चा झालेली नाही. तो सरकारचा विषय आहे ही संघटनात्मक बैठक होती, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

त्यासोबतच मविआने जो खोटारडेपणा केला, जनतेला फसवलं. आदिवासी जनतेला फसवलं, महिलांना फसवलं.. अशा अनेक विषयातून महाविकास आघाडीने मत घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी वचन दिल्यानुसार काम करतील. त्यामुळे जनता नक्की या खोटारडेपणातून बाहेर निघेल. केंद्रातील आणि राज्यातील सरकारी का विचाराचा असेल तर राज्यातील जनतेला फायदा होतो. केंद्रातील सरकार आताचे काम करणार आहे त्या सरकारचा पूर्णपणे उपयोग हा महाराष्ट्रातल्या जनतेला होईल. महाविकास आघाडी सरकार आल्यास जनतेचे नुकसान होईल. ते फक्त केंद्राच्या योजना थांबवण्याचे काम करते, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी म्हटले.

प्रचाराला अनेक मुद्दे असणार आहेत. मात्र डबल इंजिन सरकार असेल तर जनतेचा फायदा असतो. जसं उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये झालं. नरेंद्र मोदी महाराष्ट्रासाठी अनेक योजना आणायला तयार होते. मात्र उद्धव ठाकरे कधीही मंत्रालयात आले नाहीत. कधीही मोदीजींशी चर्चा केली नाही आणि त्यामुळे महाराष्ट्राचे नुकसान झालं. आम्हाला नरेंद्र मोदी नको, आम्हाला मोदीजींच्या सरकार चालत नाही या भूमिकेतून ते काम करत होते. म्हणून जनतेचे नुकसान झालं. दोन्हीकडे एका विचाराचा सरकार असेल तर जनतेचा फायदा होईल, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button