अॅड. विशाल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान, नेत्र तपासणी शिबिर
पिंपरी | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलचे भोसरी विधानसभा अध्यक्ष अॅड. विशाल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली प्रभागात रक्तदान शिबिर, मोफत नेत्रतपासणी व चष्मे वाटप शिबीर घेण्यात आले. या शिबिरात अनेकांनी रक्तदान करून समाजसेवेचा वसा जपला. तसेच गरजू नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करून मोफत चष्पे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमासाठी माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक अजित गव्हाणे, वसंत बोराटे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष यश साने, शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, अरुण बो-हाडे, गोरक्षनाथ लोखंडे, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष विजय लोखंडे, उत्तम अल्हाट, उद्योजक संतोष बारणे, कविता अल्हाट, अॅड. सचिन थोपटे, अॅड. अतीश लांडगे, अॅड. दिनकर बारणे आदी उपस्थित होते.
किल्ले बनवा स्पर्धेचे पारितोषिक वितरण
चिखली येथे किल्ले बनवा स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धकांनी उत्तमरीत्या किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते किल्ले बनवा स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेतील पाच विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.