TOP Newsदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडपुणेमुंबईराजकारणराष्ट्रिय

दिघी येथे सद्गुरू मोरेदादा यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबीर

महाराष्ट्र दिनी परिसरातील १५० जणांचे रक्तदान, कै. हिराबाई लांडगे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विधायक उपक्रम

पिंपरी । प्रतिनिधी
महाराष्ट्र दिन, कामगार दिनाचे औचित्य साधून रक्तदान सारखा विधायक उपक्रम दिघी येथे घेण्यात आला.
श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित सेवा मार्गाद्वारे सद्गुरू परमपूज्य मोरेदादा यांच्या पुण्यतिथीनिमित्त व आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री कै. सौ. हिराबाई किसनराव लांडगे यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिघी मॅक्झिन सेवा केंद्रद्वारे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात १५० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी कामगार नेते सचिन लांडगे, कानिफनाथ मंदिर चर्होली अध्यक्ष ॲड. जालिंदर जोरे, शिवशंकर महाराज व्यवहारे, अमित पाटोळे, प्रतिक सोनवणे, मुकेश लोंढे, संतोष तापकीर, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे मनोज काळे, आनंद फुले, श्रीनिवास साखरे, शिवाजी पवार, रोहित तापकीर, अमोल शिंदे, अनिल शिंदे, राजकुमार जाधव, शंकर पाटील, सागर वायकर, दादासाहेब साळुंखे, समाधान शिर्के, विजय भोसले, मुकुंदराज पाटील, शिरीष वाघुंडे, विलास हिवाळे, नवनाथ आरुडे, विलास केंद्रे, प्रशांत खलाणे, उदय फुलारी आधी उपस्थित होते.

यावेळी कामगार नेते सचिन लांडगे, ॲड. जालिंदर जोरे यांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल दिंडोरी प्रणित मार्गाचे आभार व्यक्त केले आणि सदरचे उपक्रम भविष्यात सतत होत राहावे या सदिच्छा व्यक्त केल्या. आयोजकांना प्रोत्साहन दिले. या शिबिरामध्ये सुमारे १५० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान सेवा केली. तसेच, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रक्तपेढीने सहकार्य केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button