जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपचा बिनविरोध पॅटर्न

सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. महापालिका निवडणुकीत गाजलेला ‘बिनविरोधचा पॅटर्न’ आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातही यशस्वी ठरला आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतल्यामुळे भाजपचे ४ व शिवसेनेचा १ असे जिल्हा परिषदेचे ५ उमेदवार, तर पंचायत समितीचे ५ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. येत्या २७ जानेवारी रोजी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने मुसंडी मारली असून ५ पैकी ४ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत, तर एका जागेवर शिवसेनेचा विजय झाला आहे.
हेही वाचा –अहिल्यानगर जिल्ह्यातील ८६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर
जिल्हा परिषद निवडणुकीत खारेपाटण प्राची इस्वालकर (भाजप),
बांदा प्रमोद कामत (भाजप),
जाणवली रुहिता राजेश तांबे (शिवसेना – भाजप कार्यकर्ती),
पडेल सुयोगी रवींद्र घाडी (भाजप),
बापर्डे अवनी अमोल तेली (भाजप) यांच्या समोरच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
कणकवली आणि देवगड तालुक्यात पंचायत समितीच्या जागांवरही बिनविरोध निवडी झाल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने भाजपच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे.
वरवडे (कणकवली)सोनू सावंत (भाजप),
पडेल (देवगड) अंकुश यशवंत ठूकरूल (भाजप),
नाडण (देवगड) गणेश सदाशिव राणे (भाजप),
बापर्डे (देवगड): संजना संजय लाड (भाजप)
या बिनविरोध निवडीमुळे संबंधित मतदारसंघांत निवडणुकीपूर्वीच सत्ताधाऱ्यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.




