भाजपच्या युवा मोर्चाने नागपुरात माजी गृहमंत्री अनिल देखमुख यांच्याविरोधात बॅनर लावले
शरदचंद्र पवार पक्षाकडून भाजपच्या बॅनरबाजीला जोरदार प्रत्युत्तर
![BJP, Yuva, Morcha, Nagpur, Home Minister, Anil Deshmukh, Banner, Sharad Chandra Pawar, Party, BJP, Banner, Reply,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/anil-deshmukha-780x470.jpg)
नागपूर : भाजपच्या युवा मोर्चाने नागपुरात माजी गृहमंत्री अनिल देखमुख यांच्याविरोधात बॅनर लावले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून भाजपच्या या बॅनरबाजीला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. तुमच्या पक्षातील नेत्याला तडीपार करण्यात आले होते, असे असताना तुम्ही दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांचे बॅनर का झळकवता असा संतप्त सवाल करत शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या फोटोसमोर तडीपार असे लिहिलेला बॅनर झळकावला. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळत निषेध व्यक्त करण्यात आला.
भाजपाच्या बॅनरबाजीला शरद पवार यांच्या पक्षाने चोख प्रत्युत्तर दिले आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळा जाळत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तुमच्या पक्षाच्या राजकीय नेता तडीपार होता आणि तुम्ही दुसऱ्या पक्षाच्या नेत्याविरोधात बॅनरबाजी का करता, असा सवाल करत शरद पवार पक्षाच्या कार्यतर्त्यांनी अमित शाह यांच्याविरोधातील बॅनर झळकावले.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात भाजपा युवा मोर्चाने नागपुरात वसुली बुद्धी असे बॅनर लावले होते. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने गोंदिया येथील तहसील कार्यालयसमोर निषेध व्यक्त केला. भारतीय जनता पक्ष मुर्दाबाद, देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद असे म्हणत, हातात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नावासमोर तडीपार असे लिहिलेले बॅनर झळकावण्यात आले. तसेच देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद म्हणत त्यांचा पुतळा जाळत निषेध व्यक्त करण्यात आला. भाजपमधील केंद्रीय मंत्री अमित शहा स्वतः तडीपार असताना ते दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांविरोधात बॅनरबाजी करतात, याचा आम्ही निषेध करतो, असे म्हणत शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदविला.