ताज्या घडामोडीराजकारणविदर्भ

भाजपच्याच नेतृत्वाखाली पुढचे सरकार येणार : चंद्रशेखर बावनकुळे

महायुतीत पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत घटक पक्षाकडून दावे, प्रतिदावे

नागपूर : विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच महायुतीत पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत घटक पक्षाकडून दावे,प्रतिदावे सुरू झाले आहे. आज (मंगळवारी) खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्याच नेतृत्वाखाली पुढचे सरकार येणार, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

महाविकास आघाडीकडे मुख्यमंत्र्यांचा चेहरा कोण ? अशी सातत्याने विचारणा महायुतीच्या नेत्यांकडून केली जाते. आघाडीकडे या पदासाठी अनेक दावेदार असल्याची टीकाही केली जाते. राष्ट्रवादीकडून (अजित पवार) मुख्यमंत्रीपदासाठी अजित पवार हेच पुढचे मुख्यमंत्री असणार असे सांगितले जाते तर शिवसेनेकडून शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार असा दावा केला जातो. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्याच नेतृत्वात पुढचे सरकार येणार, असे सांगतानाच पुढचा मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल याचे संकेत दिले. बावनकुळे म्हणाले, अमित शाह यांनी महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येणार हे स्पष्ट सांगितले आहे. आमच्याकडे मुख्यमंत्री पदाचा वाद नाही. आमच्याकडे अधिक जागा असल्याने भाजपच्याच नेतृत्वाखाली सरकार येणार. शिवसेना (ठाकरे) गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी महायुतीतील मुख्यमंत्रीपदाच्या वादावर टिप्पणी केली होती. त्यावर बावनकुळे यांनी वरील प्रतिक्रिया दिली. राऊत यांनी त्यांच्या महाविकास आघाडीकडे बघावे, त्यांच्या कडे १० नेते मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक आहे, असे ते म्हणाले.

मोदी यांनी लोकसभा निवडणूक प्रचारात दिलेल्या आश्वासनांची पूर्ती केद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यातील तरतुदीमुळे महाराष्ट्र अधिक बळकट होणार आहे. केंद्रात पाच वर्ष मोदी सरकार राहणार असल्याने विधानसभा निवडणुकीत आघाडीला मते देणं म्हणजे अर्थसंकल्पाला छेद होईल, असे बावनकुळे म्हणाले

अमोल मिटकरीअमोल मिटकरी यांनी महायुतीच्या मंत्र्यांवर जाहीर टीका करण्याऐवजी अजित पवार किंवा माझ्या सोबत बोलायला हवे होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित पवार व गिरीश महाजन यांच्यात कुठलाही वाद झाला नाही.एखाद्या मंत्र्याने निधीची मागणी केली असेल आणि त्याला अजित पवार काही सांगत असेल तर त्यात गैर नाही, असे बावनकुळे म्हणाले.

मोदीं भारताला तिसरी महासत्ता बनविण्यासाठी काम सुरू केले. महिला, शेतकरी, शेतमजूर, विदर्भ मराठवाडा, मेट्रो ते ग्रामीण रस्ते या साठी हा अर्थसंकल्पात निधी दिला.विरोधक नेहमी टीका करतात त्यांच्या भोंग्याकडे पाहण्यात अर्थ नाही.जे आज टीका करत आहे, त्यांनी कधीच गरीब कल्याण टॅक्समध्ये सवलत दिली नाही.

संवाद यात्रा
संवाद यात्रा पुढे ढकलली नाही, आमच्या विभागीय बैठक आहे, संवाद बैठक आहे, तालुक मंडळात बैठक आहे, नंतर प्रत्येक घरी जाऊन संवाद यात्रा होईल, असे बावनकुळे म्हणाले.

संघासोबत बैठक
आमची संघा सोबत नियमित बैठक होत असते समजाच्या कल्याणासाठी विविध विषयांवर चर्चा केली जाते. यासाठी बैठक होती.

प्रीपेड मीटर
इंडस्ट्री आणि कमर्शियल साठी स्मार्ट मीटर आहे. विरोधक संशय निर्माण करीत आहे. फेक नारेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button