breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

जळगावमध्ये भाजपला ठाकरे गटाचा धक्का; खासदार उन्मेष पाटीलांचा आज ठाकरे गटात प्रवेश

मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पक्षांमध्ये इनकमिंग-आऊटगोईंग चालू झालं आहे. अशातच भाजपाचा महाराष्ट्रातील एक मोठा नेता शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. जळगावचे भाजपचे खासदार उन्मेश पाटील आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

भाजपाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उन्मेश पाटील यांचं तिकीट कापलं आहे. पाटील यांच्याऐवजी भाजपाने जळगावातून स्मिता वाघ यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे या मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी उन्मेश पाटील शिवसेनेच्या ठाकरे गटात जाणार असल्याचं बोललं जात होतं. पाटील ठाकरे गटात जाणार असल्याच्या वृत्तावर शिवसेनेते नेते खासदार संजय राऊत यांनी शिक्कामोर्तब केलं आहे.

हेही वाचा    –      आयपीएलच्या दोन सामन्याची तारीख बदलली, पाहा संपूर्ण वेळापत्रक

खासदार संजय राऊत यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, जळगावचे विद्यमान खासदार श्री. उन्मेष पाटील व पा रोळ्याचे माजी नगराध्यक्ष श्री.करण पवार हे आज मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना परिवारात प्रवेश करीत आहेत. वेळ:12 वाजता. जय महाराष्ट्र!

दरम्यान, नाशिकचे शिंदे गटातील खासदार हेमंत गोडसे देखील पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. गोडसेंना उद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही. तसेच त्यांच्या उमेदवारीला भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील स्थानिक नेत्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे हेमंत गोडसे नाराज असल्याची चर्चा आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button