breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

गोव्यात आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भाजपच्या जाहिरनामा सादर होणार

पणजी | प्रतिनिधी 

देशात या महिन्यात होणाऱ्या पाच राज्यातील निवडणुकीचा ज्वर आता सर्वंत्र पसरु लागला आहे. दरम्यान, गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते नितीन गडकरी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आज गोवा दौऱ्यावर येणार आहेत. नितीन गडकरी यांच्या हस्ते भाजपच्या जाहिरनामा सादर होणार आहे. गडकरी काही निवडक मतदार संघांचा दौरा देखील करणार आहेत. यामुळं या जाहिरनाम्यात कोणत्या घोषणा होणार याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा दक्षिण गोव्यातील फातोर्डा व नावेली येथे जाहीर सभांना संबोधित करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 10 फेब्रुवारी रोजी गोव्यात येत आहेत. गुरुवारी म्हापसा येथील श्री बोडगेश्वर मंदिराच्या समोरील जागेत ते भारतीय जनता पक्षाच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत. यापूर्वी पंतप्रधान 11 तारखेला गोव्यात येणार असे कळविण्यात आले होते. मात्र, मोदी यांचा दौरा 10 रोजी ठरला आहे. त्यामुळं गोवा विधानसभा आपल्या हाती घेण्यासाठी भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

आतापर्यंत तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपचा जाहीरनामाही प्रसिद्ध केला जाणार होता. मात्र ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या निधनानंतर गोव्यातील सर्व कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले होते. त्यामुळे भाजपचा जाहीरनामाही प्रसिद्ध होण्यास उशीर झाला. काँग्रेसच्या जाहीरनाम्यानंतर आता भाजपच्या जाहीरनाम्यातून गोव्यातील जनतेसाठी कोणती आश्वासनं दिली जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यानंतर आज यूपीत सुद्धा गृहमंत्री अमित शहा जाहीरनाम्याचे प्रकाशन करणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button