Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणेराजकारण

Ravindra Chavan । जेजुरीच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा सरकार कटिबद्ध : रविंद्र चव्हाण

प्रचार सभा: नगरपालिका निवडणुकीत भाजपकडून विकासाचे आश्वासन

पुरंदर : जेजुरी शहर व तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्षाचे सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले. जेजुरी नगरपालिका निवडणुकीत जनता पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सोनवणे तसेच नगरसेवक पदाच्या वीस उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

या प्रसंगी माजी आमदार संजय जगताप, भाजप महामंत्री राजेश पांडे, राज्य सरचिटणीस विक्रांत पाटील, विधान परिषद आमदार योगेश टिळेकर, शहर मंडळ अध्यक्ष सचिन पेशवे, माजी आमदार अशोकराव टेकवडे, बाबाराजे जाधवराव, जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, सचिन लंबाते, मनोहर भापकर, विक्रम माळवदकर, सुधीर गोडसे आदी मान्यवर उपस्थित होते.

देशातील मंदिर पर्यटन आणि धार्मिक स्थळांच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगताना चव्हाण म्हणाले की, “याच विचारांची आणि विकासाभिमुख भूमिकेची सरकार जेजुरीत निर्माण करायची आहे.” यावेळी त्यांनी जेजुरीकरांना कमळ चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन केले.

माजी आमदार संजय जगताप आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सोनवणे यांनीही आपल्या कार्यकिर्दीतील विकासकामांचा आढावा घेत विरोधकांवर टीकास्त्र सोडले. तसेच कार्यक्रमात जगताप यांनी वीस नगरसेवक उमेदवारांचा परिचय करून देत त्यांची माहिती उपस्थितांना दिली.

हेही वाचा: Ramdas Athawale । भाजपा महायुतीचे रिपब्लिकन पक्षाकडे दुर्लक्ष : केंद्रीय मंत्री रामदास आठवले

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button