breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

“धंगेकरांची उमेदवारी रद्द करा”; भाजपाची निवडणूक आयोगाकडे मागणी

धंगेकरांनी निवडणूक आयोगाच्या सर्व नियमांचा भंग केला

पुणे : कसबा आणि चिंचवड विधासभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूका सुरू आहेत. काल दोन्ही मतदारसंघाच्या प्राराच्या तोफा थंडावल्या. निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पार्टीवर गंभीर आरोप केले. पोलिसांना हाताशी घेऊन भाजपाने पैसे वाटल्याचा आरोप केला. यावरून भाजपाने धंगेकरांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

रवींद्र धंगेकर यांनी उपोषण करत निवडणूक आयोगाच्या अचारसंहितेचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते राजेश पांडे यांनी केली आहे.

मी दोन गोष्टी आपल्याला स्पष्टपणे सांगतो, रवींद्र धंगेकर यांनी अचारसंहितेचा भंग केला आहे. कुठलेही पुरावे नसताना त्यांनी आमच्यावर आरोप केले. पोलिसांवरही आरोप केले. त्यांनी निवडणूक आयोगाच्या अचारसंहितेचा भंग केल्यामुळे आम्ही त्यांच्याविरोधात तक्रार करणार आहोत. रवींद्र धंगेकरांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशी तक्रार आम्ही निवडणूक आयोगाकडे करत आहोत. त्यांनी निवडणूक आयोगाच्या सर्व नियमांचा भंग केला आहे, असं राजेश पांडे म्हणाले.

दुसरी बाब म्हणजे, महाविकास आघाडीने निवडणुकीमध्ये जातीयवाद आणण्याचा प्रयत्न केला. विकासाच्या मुद्यावर लढली जाणारी निवडणूक त्यांनी जातीय आणि धर्माच्या ध्रुवीकरणाकडे नेली. त्यांनी मुस्लिमांना असं आवाहन केलंय की, मतदानासाठी मेलेल्या लोकांना आणा, दुबईचे आणा आणि आखातीचेही आणा..या विधानामुळे कसब्यातील हिंदू जनतेच्या भावनेला ठेच पोहचवली आहे. यामुळे या दोन्ही विषयाची तक्रार आम्ही आज निवडणूक आयोगाकडे करणार आहोत, असंही राजेश पांडे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button