breaking-newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

पुण्यात भाजप नगरसेविका अर्चना मुसळेच्या पती व भावाकडून नागरिकाला मारहाण…

पुणे |

महापालिकेच्या भाजप नगरसेविकेच्या पतीची आणि भावाची सामान्य नागरिकाला मारहाण करतानाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ओैंधच्या भाजपाच्या नगरसेविका अर्चना मुसळे यांच्या पतीने आणि भावाने सोसायटीमध्ये माझ्या विरोधात पत्रिका का वाटतो आणि माझी बदनामी का? करत आहे, असे म्हणतं एका सामान्य नागरिकाला मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या सर्व प्रकरणानंतर आता चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला असून पोलिसांचा तपास सुरू आहे. याबाबत चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. अर्चना मुसळे या भाजपच्या विद्यमान नगरसेविका आहेत.

‘त्या’ औंध येथील क्लोरीयन पार्क या एका बहुमजली इमारतीत राहतात. याच ठिकाणी यातील मारहाण झालेली व्यक्ती देखील राहते. दरम्यान या व्यक्तीने मुसळे यांच्या विरोधात पत्रके वाटली असल्याच्या कारणावरून त्यांनी मारहाण केली असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी सांगितले की, दोघांनी एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या आहेत. भाजपच्या नगरसेविका अर्चना मुसळे यांच्या पतीने मधुकर आणि भावाने इमारतीत राहणाऱ्या एका राहिवाशाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यानुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button