breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारण

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातून सर्वात मोठी बातमी, महत्त्वाचं पाऊल उचलण्याच्या तयारीत

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी दावा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवार गट लवकरच निवडणूक आयोगाकडे दावा करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गेल्यावर्षी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला होता. पण अरुणाचल प्रदेशमधील विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी दावा करणार आहेत. अजित पवार गट लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दावा करणार असल्याची माहिती दिली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोग निवडणूक चिन्ह कायदा 1968 नुसार पक्षाला राष्ट्रीय दर्जा बहाल करतं. प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकांनंतर वेळोवेळी मतांची टक्केवारी आणि इतर निकषांची पडताळणी करुन पक्षाला राष्ट्रीय दर्जा द्यायचा की काढून घ्यायचा? याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. गेल्यावर्षी नागालँड विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय दर्जा काढून घेण्यात आला होता. राष्ट्रवादी पक्षाला याआधी 10 जानेवारी 2000 ला राष्ट्रीय दर्जा मिळाला होता. हा दर्जा 2014 पर्यंत टिकून राहिला होता. या दरम्यान, 2016 मध्ये नियमांमध्ये काही बदल करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय दर्जा बहाल करण्यात आला होता.

हेही वाचा – पंढरीच्या पांडुरंगाचे पदस्पर्श दर्शन सुरु

पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळावा यासाठी लोकसभा निवडणुकीत संबंधित पक्षाला 2 टक्के जागा तीन वेगवेगळ्या राज्यात जिंकलेल्या असायला हव्यात, अशी पहिली अटक आहे. दुसरी अट म्हणजे लोकसभेत किमान 4 खासदार हवेत. यासोबतच 4 राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत किमान 6 टक्के मते मिळायला हवेत. तिसरी अट म्हणजे संबंधित पक्षाला किमान 4 राज्यांमध्ये राज्य पक्षाला दर्जा मिळायला हवा.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय दर्जा मिळाल्यास त्याचा पक्षालादेखील मोठा फायदा होता. पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळाल्यास त्या पक्षाचं चिन्ह देशभरात राखीव ठेवलं जातं. तसेच निवडणुकांपूर्वी मतदारांची अपडेटेड माहिती पक्षांना दिली जाते. तसेच निवडणुकीचा अर्ज भरताना उमेदलाराला एकाच अनुमोदकाची आवश्यकता असते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button