breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मोठी बातमी: सांगलीत विशाल पाटलांची आघाडी, सहापैकी सहा मतदारसंघात सरप्लस; चंद्रहार पाटील, संजयकाकांना सूरच गवसेना

सांगली : राज्यातील लक्षवेधी लोकसभा लढतींमध्ये समावेश असलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात भाजपच्या संजयकाका पाटील यांनी आघाडी घेतली होती. मात्र, सुरुवातीच्या अर्धा तासानंतर काँग्रेसचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी प्रचंड मोठी आघाडी घेतली आहे. तर ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील या रेसमध्ये दिसेनासे झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, विशाल पाटील यांनी सांगली लोकसभेच्या सहापैकी सहा मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली आहे. सांगलीत महाविकास आघाडीने विशाल पाटील यांना उमेदवारी द्यावी, असा स्थानिक कार्यकर्त्यांचा आग्रह होता. मात्र, ही जागा ठाकरे गटाच्या वाट्याला आल्याने चंद्रहार पाटील यांना रिंगणात उतरवले गेले. यामुळे नाराज झालेल्या विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. महाविकास आघाडीच्या मतांची विभागणी झाल्यामुळे भाजपच्या संजयकाका पाटील यांना फायदा मिळण्याची शक्यता होती. मात्र, मतमोजणीच्या पहिल्या तासाभरानंतर विशाल पाटील यांनी 7000 मतांची आघाडी घेतली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button