breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

पूजा खेडकर प्रकरण म्हणजे राजकीय कारस्थान? IAS पूजा खेडकर यांच्या वडिलांचा मोठा दावा!

पुणे | प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण स्थगित करण्याचा मोठा निर्णय LBSNAA अकादमीनं घेतला आहे. त्यानुसार २३ जुलैपूर्वी त्यांना अकादमीत हजर होण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. एकीकडे हे सर्व प्रकरण चर्चेत आलेलं असताना दुसरीकडे पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी मोठा आरोप केला आहे. हे सर्व प्रकरण म्हणजे त्यांच्याविरोधातील राजकीय कारस्थान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सगळी शासनयंत्रणा दुसरं कुठलं काम नसल्यासारखी या प्रकरणात कामाला लागली, असं कसं झालं? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

दिलीप खेडकर म्हणाले, मी फक्त तिची विचारपूस करण्यासाठी तिथे गेलो असताना माझा हस्तक्षेप असल्याचं म्हणणं चुकीचं आहे. जर या व्यवस्थेत पैशाचाच वापर झाला असता तर इथे एकही गरीब आला नसता. आता गरीब-श्रीमंताची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असते. ज्याचं ५ लाख उत्पन्न आहे, त्याच्यापेक्षा एक लाख उत्पन्नाचा माणूस गरीब असेल. शासनानं त्यात काही निकष ठरवले आहेत. नॉन क्रिमीलेअर नियमानुसारच काढलं आहे.

हेही वाचा      –      शरद पवारांपुढे शकुनी मामा फेल; भाजप नेत्याची खोचक टीका 

कोट्यवधींचे आकडे दिले जात आहेत. पण त्यात वडिलोपार्जित मालमत्ता आली आहे. माझ्या प्रतित्रापत्रात वडिलोपार्जित मालमत्तेची माहिती आली आहे. ती खरेदी कितीला केली, हे तुम्ही पाहात नाहीत. पण आज त्या मालमत्तेची काय किंमत आहे त्याची बेरीज करून हा आकडा काढला जातोय. तीही बेरीज चुकीची आहे. हे आकडे वाढवून दाखवले जात आहेत. यासंदर्भात आता समिती नेमली आहे. ती समिती त्याचा तपास करणारच आहे. क्रिमीलेअर तुमच्या उत्पन्नावर लागू होतं. मालमत्तेवर नाही. एखाद्या गरीबाकडे ५ एकर जमीन असते. तिचा बाजारभाव काही कोटींमध्ये जातो. मग त्याला गरीब म्हणणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

माझ्यावर राजकीय वरदहस्त असता, तर या प्रकरणात इतकं मीडिया ट्रायल झालंच नसतं. मी राजकीय बळी आहे. निवृत्तीनंतर आपण समाजासाठी काहीतरी काम केलं पाहिजे या हेतूने काही प्रश्न घेऊन मी लोकसभेची निवडणूक लढवली होती. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे माझं निवडणूक लढवणं माझ्या विरोधकांना पटलेलं नसू शकतं. त्याचा राग त्यांच्या मनात असू शकतो, असा दावा दिलीप खेडकर यांनी केला आहे.

विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचंही मी जाहीर केलं होतं. त्यामुळे मला कसं बदनाम करता येईल याचा विचार माझ्या विरोधकांचा होता. पण मुलांपर्यंत जाणं आणि त्यांचं भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणं हे दुर्दैवी आहे. सगळी शासकीय यंत्रणाच दुसरं काही काम नसल्यासारखी माझ्या मुलीच्या बाबतीत कामाला लागल्याचं दिसतंय, असंही दिलीप खेडकर म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button