पवना बँकेच्या निवडणुकीतून भाऊसाहेब भोईर यांची माघार
अण्णासाहेब मगर सहकार पॅनलला पाठिंबा जाहीर
![Bhausaheb Bhoir's withdrawal from Pavana Bank election](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/Bhausaheb-Bhoir-780x470.jpg)
पुणे : पवना सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीतून शहरातील ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी आज (सोमवारी) माघार घेतली आहे. त्यांनी माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार पॅनलला पाठिंबा जाहीर केला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वात जुनी असलेल्या पवना सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक ९ एप्रिल २०२३ रोजी होणार आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या १९ जागांसाठी ४६ अर्ज दाखल केले आहे. पूर्वी ८ उमेदवारांनी माघार घेतली आहे. अर्ज माघार घेण्यासाठी उद्यापर्यंत मुदत आहे. त्याच्या एकदिवस आगोदर भाऊसाहेब भोईर यांनी माघार घेतली आहे.
माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अण्णासाहेब मगर सहकार पॅनल जाहीर करण्यात आले आहे. सर्वसाधारण गटातून ज्ञानेश्वर लांडगे, विठ्ठल काळभोर, शांताराम गराडे, जयनाथ काटे, शिवाजी वाघेरे, शामराव फुगे, शरद काळभोर, सचिन चिंचवडे, अमित गावडे, चेतन गावडे, सुनील गव्हाणे, जितेंद्र लांडगे, बिपीन नाणेकर, सचिन काळभोर तर अनुसूचित जाती गटातून दादू डोळस, महिला राखीव गटातून जयश्री गावडे, उर्मिला काळभोर, इतर मागासवर्गीय गटातून वसंत लोंढे आणि भटक्या विमुक्त जाती गटातून संभाजी दौडकर यांचा पॅनेलमध्ये समावेश आहे.