चंद्रशेखर बावनकुळे वेस्ट इंडीजच्या खेळाडूसारखे दिसतात’; भास्कर जाधव यांचा टोला
![Bhaskar Jadhav said that Chandrasekhar Bawankule looks like a West Indies player](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/chandrashekhar-bawankule-and-Bhaskar-jadhav-780x470.jpg)
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल अयोध्या दौऱ्यावर होते. यावरून विरोधीपक्षातील नेते सत्ताधारी नेत्यांवर जोरदार टीका करतानी दिसत आहेत. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
भास्कर जाधव म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्राचे आहेत मात्र दिसतात वेस्ट इंडिजच्या खेळाडूसारखे. विवियन रिचर्ड मजबूत होता, चंद्रशेखर बावनकुळे पॅट्रिक पॅटरसनसारखा दिसतो का तर नाही, ब्रायन लारसारखो दिसतो का नाही मग तो कोणासारखो दिसतो तर त्यावेळी वेस्ट इंडिजचा खेळाडू अॅब्रोससारखा सारखा तो दिसतो, हे लक्षात आले. जुन्या लोकांना माहित आहे अॅब्रोस कसे होते. नाहीतर बावनकुळे त्यांना रागवायचे.
तुम्ही वेस्ट इंडिजच्या खेळाडूसारखे दिसतात. मात्र ते खेळाडू होते तुम्ही कोणासोबत खेळताय, उद्धव ठाकरेंबरोबर. उद्धव ठाकरे तुम्हाला एका बॅलवर आऊट करतील पत्ता सुद्धा लागणार नाही, असं भास्कर जाधव म्हणाले.