‘‘ध्येयवादी देवेंद्रजी’’ कॉफी टेबल बुकचे प्रकाशन भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन
मुख्यमंत्री फडणवीस यांचा सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय प्रवास मांडण्याचा प्रयत्न
पिंपरी-चिंचवड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ध्येयवादी नेतृत्वावर आधारित ‘ध्येयवादी देवेंद्रजी’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन मंगळवारी भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण यांच्या हस्ते भाजपा प्रदेश कार्यालयात उत्साहात पार पडले. या पुस्तकाच्या संकल्पनेचे जनक आणि भाजप पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा सरचिटणीस विजय शिंदे यांनी यावेळी प्रास्ताविक करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
सावी पब्लिकेशन प्रकाशित या पुस्तकाचे संपादन सोयम अस्वार यांनी केले असून, या पुस्तकात मुख्यमंत्री फडणवीस यांचा सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय प्रवास अत्यंत आकर्षक छायाचित्रांसह मांडण्यात आला आहे.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मनोगत
“हे पुस्तक म्हणजे केवळ देवेंद्रजींच्या कार्याचा आढावा नाही, तर त्यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राच्या विकासाची गाथा आहे. जलयुक्त शिवार यांसारख्या महत्त्वपूर्ण योजनांपासून ते पायाभूत विकासापर्यंतचा त्यांचा प्रवास हे पुस्तक प्रेरणादायी बनवते.”
— रवींद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र
“आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण ज्या नेत्याच्या कार्यामुळे महाराष्ट्राला एक नवी ओळख मिळाली, त्यांच्या कार्यावर आधारित हे पुस्तक साकारण्याचा मान मला मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ विकासाची गती वाढवली नाही, तर समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहोचवला. त्यांच्या दूरदृष्टीचे आणि तळमळीचे दर्शन या पुस्तकातून घडेल, अशी मला खात्री आहे.“
— विजय शिंदे, सरचिटणीस, भाजपा पिंपरी-चिंचवड
या प्रकाशन सोहळ्याला आमदार विक्रांत पाटील, आमदार अमित गोरखे, आमदार किसन कथोरे, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, सरचिटणीस विजय शिंदे, सखी सोबती फाउंडेशनच्या अध्यक्षा गिरीजा शिंदे, प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता पालांडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शत्रुघ्न काटे यांनी केले.




