बंजारा समाजाचा मेळावा उत्साहात; खासदार डॉ. उमेश जाधव यांची उपस्थिती
![Banjara community gathers in excitement; MP Dr. Presence of Umesh Jadhav](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/Rathod-780x470.jpeg)
पिंपरी : गुलबर्गा कर्नाटक विधानसभा मतदार संघाचे खासदार आणि बंजारा समाजाचे लोकप्रिया खासदार डॉ. उमेश जाधव यांच्या मार्गदर्शनामध्ये पिंपरी-चिंचवड येथील समस्त बंजारा समाजाचा मेळावा उत्साहात पार पडला.
खासदार डॉ. उमेश जाधव यांनी पिंपरी-चिंचवड येथील बंजारा समाजाच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच, विविध समस्यांवर राज्य सरकारकडून ठोस उपाय योजना करून देतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देश पातळीवर योग्य ती मदत बंजारा समाजाला मिळवून दिली जाईल, असे आश्वासन समाज बांधवाना दिले.
यावेळी उपस्थित बंजारा ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रताप राठोड, बंजारा शिक्षण अभियानचे समन्वयक सूर्यकांत राठोड, बंजारा समाजाचे नेते नितीन चव्हाण, तसेच विजय राठोड, दिलीप जाधव, युवराज आडे, उमेश राठोड , रावसाहेब राठोड, इरण्णा पाटील, युवा नेते अण्णा पवार, सतीष चव्हाण, मलींगा राठोड, लालसींग चव्हाण यांनी बंजारा समाजातील समस्या मांडल्या समाजातील अनेक मान्यवर आणि प्रतिष्ठित व्यक्ती कार्यक्रमाला उपस्थित होते.
रमेश राठोड यांनी सूत्रसंचलन केले. अतिशय उत्साहामध्ये चिंचवड येथे हा मेळावा पार पडला. युवा नेते उमेश राठोड यांनी सर्वांचे आभार मानले.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/Rathod-1.jpeg)