breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘शरद पवारांना सोडलं तर माझी बायको..’; खासदार बजरंग सोनावणे यांची प्रतिक्रिया

पुणे | बीड लोकसभा निवडणुकीत बजरंग बाप्पा सोनावणे हे जायंट किलर ठरले आहेत. नी भाजपच्या पंकजा मुंडे यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव केला. परंतु, निवडणुकीनंतर खासदार बजरंग सोनवणे पुन्हा अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केला होता. त्याचा बाप्पा सोनावणे यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

मला पदरात घ्या, असा फोन बजरंग सोनावणे यांनी अजित पवार यांना केल्याचा दावा मिटकरी यांनी केला होता. त्यावर बजरंग सोनवणे म्हणाले, अमोल मिटकरी हे अजित दादांच्या बंगल्यावरील ऑपरेटर आहेत का? कोण आहेत अमोल मिटकरी? असा सवाल बजरंग सोनावणे यांनी केला. कारण ऑपरेटर कडेच फोनचे रेकॉर्ड असते, असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा      –      जम्मू कश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला, गोळीबारात १ दहशतवादी ठार

माझ्या बीड जिल्ह्यातील जनतेने खूप प्रेम केले आहे. माझ्या मनात जर काही पाप असेल तर मी घराच्या बाहेर पडताच जिल्ह्यातील जनता माझं तोंड चपलाने फोडेल. पवार साहेबांना सोडायचं म्हंटल्यावर माझे वडील मला कानसुलित मरतील.माझी बायको म्हणेल तुला खायला पण नाही, नाश्ता देखील नाही, अशी परिस्थिती होईल, असं बजरंग सोनवणे म्हणाले.

राजकारणाच्या पलिकडे काही विषय असतात, मात्र हे राजकारणावर का आणतात हे समजले नाही. कारखाना अडचणीत असेल किंवा चोर असेल तरी एवढा मोठा निर्णय घेणार नाही. ट्वीट करण्याचा धनी किंवा त्याचा बोलविता धनी कोण आहे हे अमोल मिटकरी यांनी सांगावं. विधानसभेत आमच्या २००च्या वर जागा लागतील. आकडा सांगणे हे आमचा धंदा नाही.आमचं सरकार येणार म्हणजे येणार हे मी जबाबदारीने सांगतो. पक्ष जो माझ्यावर मराठवाड्यातील विधानसभेची जबाबदारी देईल तेवढं मी पार पाडेन. ऑपरेटरला उत्तर देणे हे खासदार म्हणून माझे काम नाही, असंही बजरंग सोनवणे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button