breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

‘चोरी, दरोडा, बलात्कार या सगळ्यात मुस्लिम नंबर वन’; खासदार बदरूद्दीन अजमल यांचं विधान

नवी दिल्ली : ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटीक फ्रंटचे (AIUDF) प्रमुख बदरुद्दीन अजमल यांच्या एका विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे. बलात्कार, लूटमार, दरोडा सगळ्या गुन्ह्यांमध्ये मुस्लिम नंबर वन आहेत. तसंच तुरुंगात जाण्यातही मुस्लिमांचाच पहिला क्रमांक लागतो, असं बदरूद्दीन अजमल म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर वाद निर्माण झाला आहे.

बदरूद्दीन अजमल म्हणाले, चोरी, दरोडा, बलात्कार या सगळ्यात मुस्लिम नंबर वन आहेत. तसंच तुरुंगात जाण्याच्या बाबतीतही आपला पहिला क्रमांक लागतो. आपल्या (मुस्लिम समुदाय) मुलांकडे शाळेत किंवा महाविद्यालयात जायला वेळ नसतो. मात्र जुगार खेळण्यासाठी, दुसऱ्यांना फसवण्यासाठी वेळ असतो. जरा स्वतःच्या मनाला विचारा की हे काय करत आहात. सगळ्या चुकीच्या गोष्टींमध्ये मुस्लिम आघाडीवर आहेत आणि ही अत्यंत वेदना देणारी गोष्ट आहे.

हेही वाचा – Kojagiri Purnima 2023 : कोजागिरी पौर्णिमेचे महत्व काय? मुहूर्त आणि तिथी जाणून घ्या.. 

लोक चंद्रावर जात आहेत, सूर्यावर यान धाडत आहेत, पीएचडी करत आहेत. एकदा जरा पोलीस स्टेशनला जाऊन बघा तिथे तुम्हाला समजेल सर्वाधिक गुन्हेगार कोण? अब्दुल रहमान, अब्दुल रहीम, अब्दुल मजीद, बदरुद्दीन, सिराजउद्दीन अशीच नावं तिथे गुन्हेगारांच्या यादीत सापडतील. ही गोष्ट क्लेशदायक नाही का? असंही बदरूद्दीन अजमल म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button