‘सरकारने शब्द न पाळल्यास जरांगेंसोबत आंदोलन करणार’; बच्चू कडू यांचा सरकारला इशारा
![Bacchu Kadu said that if the government does not keep its word, it will protest with Jarange](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Manoj-Jarange-Patil-and-Bacchu-Kadu-780x470.jpg)
मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही महिन्यापासुन चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांना सरकारने २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. ही मुदत संपवण्यासाठी काही दिवस राहिले आहेत. मात्र, राज्य सरकारकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. यावरून, प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी सरकारला इशारा दिला आहे.
बच्चू कडू म्हणाले, १७ डिसेंबरला जरांगे-पाटील नवीन आंदोल नाची घोषणा करणार आहेत. जरांगे-पाटलांना दिलेल्या आश्वासनांचा अहवाल सरकारनं दिला नाही. सरकारनं जरांगे-पाटलांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली पाहिजे. जरांगे-पाटलांना दिलेल्या आश्वासनांनी पूर्तता केली नाही, तर आम्हाला आंदोलनात सहभागी व्हावं लागेल.
हेही वाचा – निमगाव चोभा ग्रामपंचायतीमध्ये वर्षभरातच विविध कामांचा धडाका!
मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?
मराठा आरक्षणासाठी सरकारनं आतापर्यंत काय कार्यवाही केली? हे १७ डिसेंबरपर्यंत कळवावे. तुम्ही मराठ्यांची फसवणूक करत असल्याचा संशय आम्हाला येतोय. १७ डिसेंबरला आम्ही आंदोलनाचा निर्णय घेतला की तुमचा आणि आमचा विषय संपला, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.