breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

अजित पवार, शरद पवारही एकत्र येऊ शकतात; आमदार अतुल बेनके यांचं मोठं विधान

मुंबई | आमदार अतुल बेनके यांनी खासदार अमोल कोल्हेंच्या निवासस्थानी शरद पवार यांची भेट गेतली. या भेटीबाबत विचारले असता, लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यांनी काम केले ते आमचे आहेत, असं सूचक वक्तव्य शरद पवरांनी केले. त्यामुळे, अतुल बेनकेंनी लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाचे काम केले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, यासंदर्भात अतुल बेनकेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

आमदार अतुल बेनके म्हणाले, पवार साहेब, अजित पवार, सुप्रिया ताई, दिलीप वळसे पाटील अशा सर्वांचा माझ्यावर आशीर्वाद राहिला आहे. या सगळ्या नेत्यांना पाहतच मी मोठा झालो आहे आणि एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून मी जुन्नर तालुक्यातून निवडून आलो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी काही स्थित्यंतरे झाली; तेव्हा मी सहा महिने तटस्थ भूमिकेत होतो. शरद पवार साहेबांबरोबर जायचे की अजित पवार यांच्याबरोबर जायचे, याबाबतचा गोंधळ माझ्या मनात होता. जुन्नर तालुक्याचा मी लोकप्रतिनिधी असल्याने लोक अनेक विकास कामांसाठी माझ्याकडे अपेक्षेने येतात. ही विकासकामे पूर्णत्वास जावीत, यासाठी मी अजित पवार यांच्याकडे राहण्याचा निर्णय घेतला. त्यातून जुन्नर तालुक्याला न्याय देऊ शकलो, याबाबत माझ्या मनात समाधान आहे.

हेही वाचा     –        ऋतुराज गायकवाडला भारतीय संघातून वगळल्याने माजी दिग्गज संतापला; म्हणाला.. 

दार ठोठावायचा विषय नाही. मी त्या दृष्टीकोनातून अद्याप विचार केलेला नाही. किंवा अतुल तू इकडे ये, असेही पवार साहेब मला कधी म्हणालेले नाहीत. राजकारण राजकारणाच्या पातळीवर चालत राहिल. आमदार झाल्यापासून मी अनेक स्थित्यंतरे पाहिलेली आहेत आणि येणाऱ्या काळात काय घडेल, याची मला कल्पना नाही. मात्र, त्यामध्ये न पडता जुन्नरच्या हितासाठी जे काम करता येईल, ते मी करत राहीन, असं अतुल बेनके म्हणाले.

विधानसभा निवडणुकीला अद्याप वेळ आहे. या निवडणुकीला सामोरे जात असताना काहीही होऊ शकतं. त्यावर आता लगेच भाष्य करण्यात काहीही अर्थ नाही. महायुतीच्या जागावाटपामध्ये काहीही घडू शकतं. कदाचित अजित पवार आणि शरद पवार साहेबही एकत्र येऊ शकतात. २८८ मतदारसंघांमधील मी एक छोटा घटक असल्याने पुढे काय होणारे, याबाबत मी कसे काय सांगू शकेन? असंही अतुल बेनके म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button