breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘महाराष्ट्रातही बजरंग दलावर बंदी घालावी’; अशोक चव्हाण

मुंबई : काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये काँग्रेस सत्तेत आल्यास बजरंग दल आणी पीएफआयसारख्या संघटनांवर बंदी घालू असं आश्वासन दिलं आहे. या मुद्यावरू राजकारण चांगलच तापलं आहे. दरम्यान, काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्रातही बजरंग दलावर बंदी घालावी अशी मागणी केली आहे.

अशोक चव्हाण म्हणाले की, भाजपने धार्मिक मूलतत्ववाद आणि दहशतवाद याविरोधात लढण्यासाठी स्वतंत्र पोलीस शाखा स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचा अर्थ काय होतो हे त्यांना विचारा. कायदा आणि राज्यघटना पवित्र आहेत आणि बजरंग दल, पीएफआय आणि इतर कोणत्याही संघटना किंवा व्यक्तींना बहुसंख्याक किंवा अल्पसंख्याक यांच्यामध्ये शत्रुत्व किंवा द्वेषाचा प्रसाच करू देता कामा नये. आम्ही अशा संस्थांवर बंदी घालण्यासह निर्णायक कायदेशीर कारवाई करू.

दरम्यान, काँग्रेसचे नेते आता मुख्यमंत्री झाल्यासारखे वागायला लागले आहेत. प्रत्येकाला वाटतं की आपण मुख्यमंत्री आहोत. काँग्रेसच्या नेत्यांकडून विविध समाजाचा अपमान केला जातो. आता तर यांची मजल इथपर्यंत पोहोचली की ते आता बजरंग दलावर बंदी घालण्याची भाषा करत आहेत. मात्र, बजरंग दलावर बंदी घालायची कोणाच्या बापाची हिंमत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button