breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

इंडिया आघाडीत मोठी फूट? अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा!

नवी दिल्ली | बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी इंडिया आघाडीला रामराम करत भाजपाशी घरोबा केला आहे. यानंतर राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख जयंत चौधरी हे एनडीएत सहभागी होणार असल्याच्या वृत्तांवर काल शिक्कामोर्तब झालं. त्यानंतर आता इंडिया आघाडीतील मोठा पक्ष बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी इंडिया आघाडीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे.

आम आदमी पार्टी पंजाबमधील सर्व लोकसभा जागांवर निवडणूक लढवणार आहे. त्यांचा पक्ष लवकरच राज्यातील १३ उमेदवारांची यादी जाहीर करेल. या घोषणेसह आपने स्पष्ट केलं आहे की, ते पंजाबमध्ये काँग्रेससह कुठल्याही पक्षाशी युती करणार नाहीत, अशी घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

हेही वाचा    –      महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित जिल्हा ग्रंथोत्सवाचे माजी महापौर उषाताई ढोरे यांच्या हस्ते उद्घाटन

अरविंद केजरीवाल म्हणाले की, मी आज पुन्हा एकदा सर्व जनतेसमोर हात जोडून आशीर्वाद मागतो. दोन महिन्यांनी होणारी लोकसभा निवडणूक आम्ही लढवणार आहोत. पंजाबमधील सर्व १३ जागा आणि चंदीगडमधील एका जागेवर आम्ही आमचा उमेदवार जाहीर करणार आहोत. येत्या १० ते १५ दिवसांत मी आमच्या सर्व १४ उमेदवारांची यादी जाहीर करेन. मी सर्व जनतेला विनंती करेन की, ज्याप्रकारे तुम्ही दोन वर्षांपूर्वी मला आणि आमच्या आम आदमी पार्टीला आशीर्वाद दिला. तसाच आशीर्वाद यावेळी पुन्हा एकदा द्या. आमच्या सर्व १४ उमेदवारांना मोठ्या मताधिक्यासह जिंकवा.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button