breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारणराष्ट्रिय

अरारा खतरनाक ः पंतप्रधान नरेंद्र मोदीही होते पीएफआयच्या निशाण्यावर, ईडीचा दावा

Arara is dangerous: Prime Minister Narendra Modi was also targeted by PFI, claims ED

नवी दिल्ली । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

टेरर फंडिंग आणि ट्रेनिंग कॅम्प चालवण्याप्रकरणी ईडी आणि एनआयएने अलीकडेच केरळ, तामिळनाडू आणि यूपीसह देशातील 11 राज्यांमध्ये छापेमारी करून पीएफआयच्या (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) 106हून अधिक कार्यकर्त्यांनी अटक केली. पीएफआयने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्यत्र हल्ले करण्याचा कट पीएफआयने रचला होता, असा दावा ईडीने केला आहे.

यावर्षी जुलै महिन्यात 12 तारखेला बिहारची राजधानी पाटणा येथे पंतप्रधान मोदी यांच्या सभेत स्फोट घडविण्याचा कट रचून त्यासाठी ट्रेनिंग कॅम्पही घेतला होता. तिथे या संघटनेच्या काही सदस्यांना ट्रेनिंग देण्यात आले होते. पंतप्रधानांच्या दैनंदिन कार्यक्रमांवर त्यांची नजर होती. शिवाय, इतर ठिकाणी हल्ले करण्यासाठी टेरर मॉड्यूलही तयार करण्यात येत होते. त्याद्वारे शस्त्रे आणि स्फोटके जमा करण्यात येत होती, असे ईडीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

भारताला मुस्लीम देश बनविण्याची मनीषा
पाटण्यात पीएफआयच्या संशयितांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडे काही आक्षेपार्ह कागदपत्रे सापडली होती. त्यात ‘इंडिया 2047’ नावाचे एक बुकलेटही होते. हे बुकलेट म्हणजे 2047पर्यंत भारताला मुस्लीम देश बविण्याची ‘दहशतवादी ब्लूप्रिंट’ होती. दहशतवादी कारवायांसाठी ठिकठिकाणी ट्रेनिंग कॅम्प घेण्यात येत असल्याचेही त्यावेळी उघड झाले होते. परंतु बिहार पोलिसांनी ही बाब गांभिर्याने घेतली नाही.

मोठ्या प्रमाणावर फंडिंग
वित्तपुरवठ्यासाठी ही संघटना विदेशी स्रोतांच्या संपर्क साधण्याच्या प्रयत्नात होती. गेल्या काही वर्षांत संघटनेने सुमारे 120 कोटी रुपये जमा केले आहेत. देशभरात दंगली आणि दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी या पैशांचा वापर करण्यात येणार होता. फेब्रुवारी 2020मध्ये दिल्लीमध्ये दंगल घडवून आणण्यासाठी तसेच हाथरसमध्ये हिंसाचार घडवून आणण्यासाठी या पैशांचा वापर करण्यात आला होता, असा दावाही ईडीने केला आहे.

‘ऑपरेशन ऑक्टोपस’अतंर्गत कारवाई
पीएफआयविरोधात 22 सप्टेंबर रोजी एनआयएने केलेल्या कारवाईला ‘ऑपरेशन ऑक्टोपस’ नाव देण्यात आले होते. तर, ईडीने परवेझ अहमद, मोहम्मद इलियास आणि अब्दुल मुकीत यांना दिल्लीत अटक केली होती. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी पीएफआयविरोधात 2018पासून तपास सुरू झाल्यावर या सर्वांची अनेकदा चौकशी करण्यात आली होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button