breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

वाईन विक्री धोरणाच्या निषेधार्थ अण्णा हजारे यांचे १४ पासून उपोषण

नगर |

महाविकास आघाडी सरकारने सुपर मार्केट व किराणा दुकानातून वाईन विक्रीचा निर्णय घेतला, या निर्णयाला विरोध करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी १४ पासून राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथील श्री संत यादवबाबा मंदिरात उपोषणाचा निर्णय जाहीर केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून राज्य सरकारच्या या निर्णयामुळे बरबादीकडे जाणारी युवाशक्ती व संस्कृतीची होणारी अधोगती पाहायला लागू नये, यासाठीच आपण बेमुदत उपोषण करत असल्याचे म्हटले आहे.

राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी हजारे यांनी सुरुवातीला मुख्यमंत्र्यांना व उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले. त्यानंतर निर्णय मागे घेण्यासाठी उपोषणाचा इशारा दिला. परंतु सरकारने त्यांच्या पत्राला प्रतिसाद न दिल्याने अखेर हजारे यांनी बेमुदत उपोषणाचा निर्णय जाहीर केला. हजारे यांनी पत्रात म्हटले की, केवळ वाढणारा महसूल व वाईन उत्पादक आणि विक्रेत्यांचे हित पाहून हा निर्णय घेतल्याचे दिसते. परंतु लहान मुले, तरुण व्यसनाधीन होऊ शकतात, महिलांना त्रास होऊ शकतो याचा विचार सरकारने केलेला दिसत नाही, याची खंत वाटते. वाईन ही दारू नाही असा दुर्दैवी युक्तिवाद सरकारकडून करण्यात येतो हेही आश्चर्यकारक आहे.

 

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button