‘..अन् अजित पवार भाजप बरोबर जाणार’; अंजली दमानियांचं ट्वीट चर्चेत
सध्या घाणेरडं राजकारण सुरू आहे
![Anjali Damania has said that Ajit Pawar will go with BJP](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/ajit-pawar-and-devendra-fadnavis-780x470.jpg)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे लवकरच राष्ट्रवादीला सोडचिट्टी देऊन भाजपमध्ये जाणार आहेत, असा दावा राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा दावा केला आहे. अंजली दमानिया यांनी ट्वीट करत हा दावा केला आहे. दमानिया यांच्या या ट्वीटने एकच खळबळ उडाली आहे.
आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, १५ आमदार बाद होणार आहेत, आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत….तेही लवकरच बघू…..आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची, असं ट्वीट अंजली दमानिया यांनी केलं आहे.
सध्या घाणेरडं राजकारण सुरू आहे. मी बातम्यांचे धागेदोरे जोडून माझा अंदाज व्यक्त केला. मला एका व्यक्तीने सांगितलं १६ आमदार बाद होणार आहे. भाजपला बॅकअप हवा आहे. त्यामुळे अजितदादा त्यांनी पुरक ठरू शकतात. त्यामुळे मी हे ट्वीट केलं, असं अंजली दमानिया यांनी स्पष्ट केलं आहे.