TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय
“हैद्राबादमध्ये ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटादरम्यान अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत
हैदराबादः वयाची सत्तरी ओलांडली तरी बिग बी अमिताभ बच्चन आजही तितक्याच जोमाने कलाक्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करत आहेत. बिग बी यांचे काही चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘प्रोजेक्ट के’. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे. याचदरम्यान अमिताभ यांच्याबरोबर एक विचित्र घटना घडली. हैद्राबादमध्ये चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असताना त्यांना दुखापत झाली आहे.
अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “हैद्राबादमध्ये ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाचा अॅक्शन सीन चित्रीत करत असताना मी जखमी झालो आहे. बरगड्यांच्या मांसपेशींना दुखापत झाली आहे. चित्रीकरणही रद्द करण्यात आलं. एआईजी रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासणीही झाली”.