Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जींची सत्ता जाणार; अमित शाहांचा दावा

Amit Shah | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गुरुवारी पार पडलेल्या १५२ जागांच्या मतदानामध्ये ९१.७८% इतकी विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे. या वाढलेल्या मतदानामुळे राज्यात सत्तापरिवर्तन होणार असून, भाजपा मोठ्या बहुमताने विजयी होईल, असा ठाम विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.

कोलकाता येथे आयोजित पत्रकार परिषदेत शाह बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अमित शाह म्हणाले की, पहिल्या टप्प्यातच बंगालच्या जनतेचे भाजपाच्या बाजूने कौल दिला आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली येथील जनतेने विकासाला मत दिले आहे. वाढलेला मतदानाचा टक्का दीदींची (ममता बॅनर्जी) घरी जाण्याची वेळ आली असून, आता भाजपा सत्ता स्थापन करणार हेच दर्शवतो.

हेही वाचा 

वरळीतील मोर्चात जाब विचारणाऱ्या महिलेविरोधात झेन सदावर्तेंची तक्रार

मतदानाचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर पक्षाने लावलेला अंदाज आणि काढलेल्या निष्कर्षानुसार, १५२ पैकी भाजपा ११० जागांवर विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याचा अर्थ दुसऱ्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर भाजपा सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असणारे बहुमत गाठेल, असेही शाह म्हणाले. मतदारांमध्ये सध्या असलेला उत्साह त्यांनी पुढेही असाच कायम ठेवावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ०५ मे नंतर अंगा, बंगा आणि कलिंगा भाजपाच्या सत्तेखाली येईल, पूर्वेतील राज्यांसाठी ही चांगली बाब आहे, असेही शाहांनी नमूद केले.

भाजपाची सत्ता आल्यानंतर राज्यात महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाईल, असे अमित शाह म्हणाले. शिवाय बदल म्हणजे घुसखोरीमुक्त बंगाल, भ्रष्टाचारमुक्त बंगाल, खंडणीखोरांना चाप आणि युवकांना रोजगाराच्या संधी, असे शाहांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ‘बाहेरचे लोक सत्तेवर येतील असे सांगून ममता बॅनर्जी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करु पाहत आहेत, असा आरोप शाहांनी यावेळी केला. पण, पुढचा मुख्यमंत्री हा बंगालमधीलच असेल, त्याचं जन्म आणि शिक्षण इथेच झालं असेल आणि त्याचा बंगाली उत्तम बोलता येत असेल, असाच मुख्यमंत्री होईल, अशी ग्वाही शाहांनी दिली. दरम्यान, २९ एप्रिल रोजी बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार असून, ०४ मे रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button