TOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

चिंताजनकः पुण्यात H3N2 चे २२ रुग्ण आढळले, ५ वर्षांखालील मुलांसाठी धोका वाढला

पुणे : H3N2 cases in Pune : पुण्यात H3N2 चे तब्बल २२ रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. इन्फ्लुएंझा ए विषाणूचा उपप्रकार असलेल्या ‘H3N2’ या विषाणूचे सर्वाधिक रुग्ण हे १९ ते ६० वयोगटातील असल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेनं दिला आहे. पुणे शहरात कोरोनाने धुमाकूळ घातला होता. आता कुठे कोरोनाचा विसर पडत जनजीवन सुरळीत होत असताना पुन्हा एका नव्या व्हायरसने पुणेकरांच्या चिंतेत भर टाकली आहे. H3N2 या व्हायरसने पुणेकरांची चिंता वाढवली आहे. पुण्यात H3N2 चे २२ रुग्ण आढळले आहे. तर देशभरात आतापर्यंत २ जणांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.

इन्फ्लुएंझा ए विषाणूचा उपप्रकार असलेल्या ‘H3N2’ या विषाणूचे सर्वाधिक रुग्ण हे १९ ते ६० वयोगटातील असल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेनं दिला आहे. यावरून या विषाणूची साथ पुण्यात मोठ्या प्रमाणावर पसरली असल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्हायरसची लक्षणं ही सामान्य फ्ल्यूसारखीच आहे. त्यामुळे जीवघेणी बाब नसल्यामुळे घाबरण्याचे कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सर्दी, ताप, खोकला आणि जुलाब ही H3N2 इन्फ्लूएंझा संसर्गाची लक्षणे आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी राज्य सरकारांना सतर्क राहण्याच्या आणि वाढत्या संसर्गावर सतत लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, पुण्यात वातावरण बदलामुळे सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. दुसरीकडे H3N2 व्हायरसने पुणेकरांची चिंता वाढल्याने सतर्क राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

आरोग्य विभागाने सांगितली ही लक्षणे
H3N2, हा इन्फ्लूएंझा A चा उपप्रकार आहे. राज्याच्या आरोग्य विभागानुसार इतर इन्फ्लूएंझा उपप्रकारांपेक्षा जास्त संख्येने रुग्ण रुग्णालयात दाखल होत असल्याचे दिसते. गंभीर तीव्र श्वसन सिंड्रोम (SARI) दर्शविणार्‍या सध्याच्या रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांमध्ये अशी लक्षणे दिसून आली आहेत. जेथे ICMR च्या निरीक्षणानुसार, सुमारे ९२ % तापाने, ८६ % खोकल्यासह, २७ % श्वासोच्छवासासह, १६ % अस्वस्थ वाचत असल्याची तक्रार घेऊन येतात. याशिवाय, १६ टक्के रुग्णांमध्ये निमोनियाची लक्षणे होती, असे अहवालात म्हटले आहे. तर ६ टक्के रुग्णांना फेफरे आल्याचे आढळले. त्याच वेळी, SARI रुग्णांपैकी सुमारे १० टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असते. तर ७ टक्के रुग्णांना आयसीयूमध्ये काळजी घ्यावी लागते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button