breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

अजित पवार यांचा अप्रत्यक्ष पंतप्रधान मोदींवर टोला ः मी आईला भेटायला जातो, पण फोटो काढत नाही

Ajit Pawar's indirect attack on PM Modi: I go to meet my mother, but I don't take pictures

बारामती । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार हे बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. दिवसभरात पवार यांचे विविध कार्यक्रम होत असून प्रत्येक ठिकाणी ते कार्यकर्त्यांना संबोधित करत आहेत. अशाच एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना त्यांचे नाव न घेता फोटो काढण्यावरून अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. बारामती बँकेच्या वेगवेगळ्या ठिकाणी शाखा सुरु होत आहेत. ज्यावेळी बँकेत नोकरी लागण्याची वेळ येते, त्यावेळी नोकरीसाठी बँकेत संधी मिळाल्यानंतर काही दिवसांनी त्यांचे आईवडील, पालक येतात. दहा वर्षे माझा मुलगा, सून, जावई बारामती सोडून राहिले आहेत. त्यांना येथे आणण्यासाठी आग्रह धरला जातो. त्यांना येथे आणा…आणा…आणा. मात्र, येथे जागा शिल्लक नाही..नाही…नाही. तुम्ही मला काटेवाडीतून मुंबईला पाठविले. मी कधी रडतो का, इथे यायचंय…यायचंय…अशा पध्दतीने यमक जुळवत मिश्कील टिप्पणी अजित पवार यांनी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी आईला भेटायला जातो, पण फोटो काढत नाही असा टोला विरोधी पक्षनेते पवार यांनी पंतप्रधानांचे नाव न घेता लगावला.

व्यसनांपासून दूर राहा- अजित पवार
सध्या कॅन्सरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. प्रत्येकाने गुटखा, तंबाखू, सिगारेट, बिडी, दारू आदी व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे, असा सल्ला विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी बारामतीत बोलताना दिला. पवार म्हणाले की, माणसाला आयुष्यात एकदाच जीवन मिळत असतं. आपल्याला आई-वडिलांनी जन्म दिल्यानंतर व्यसनाच्या आहारी न जाता आपण आपला आयुष्य सार्थकी लावले पाहिजे, असे पवार पुढे म्हणाले.

हे सर्कस सरकार, खरे मुख्यमंत्री कोण हेच कळत नाही; आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल
व्यसन करणाऱ्यांचा मला तितकारा आहे, असे सांगून पवार म्हणाले की, माझे सहकारी तंबाखूचे व्यसन करीत होते. त्यांना मी वेळोवेळी भर सभेतही बोललो. आज ते माझ्या बरोबर नाहीत असे म्हणत त्यांनी व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला उपस्थितांना दिला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button