TOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

एकनाथ शिंदेंच्या खुर्चीवर अजित पवार बसवलं, मनोरा आमदार निवासाच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी घडली रंजक घटना

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय खळबळ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आज मनोरा आमदार निवासाच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान मंचावरील एक घटना राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. आजच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते. मात्र, अजित पवार व्यासपीठावर पोहोचले आणि नकळत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी राखीव खुर्चीवर बसले. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वत: अजित पवार यांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसण्यास सांगितले. राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसण्यापूर्वी अजित पवार यांचे स्टिकर काढले.

मानोरा आमदार निवासाचे भूमिपूजन
गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या मंत्रालयाजवळील मनोरा आमदार निवासाचे भूमिपूजन पार पडले. विधानसभा आणि विधानपरिषदेच्या आमदारांच्या निवासासाठी 40 आणि 28 मजल्यांच्या दोन इमारती बांधण्यात येणार आहेत. या इमारतींमध्ये अनेक उत्कृष्ट सुविधा असतील. या कामांसाठी अंदाजे 1,300 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button